केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले : ६ जणांचा मृत्यू 

व्हिडीओ पहा

0

नवी दिल्ली,१८ ऑक्टोबर २०२२ – उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका खासगी कंपनीचे हेलीकॉप्टर कोसळून ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथक पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केदारनाथ येथील धाम परिसरात हेलिकॉप्टर कोसळले आहे. या अपघातात ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात गरुडचट्टीजवळ झाला आहे. हे हेलिकॉप्टर आर्यन हेली कंपनीचे असल्याचे सांगितले जात आहे.

या हेलिकॉप्टरमध्ये ६ जण प्रवास करत होते. खराब हवामान आणि धुक्यांमुळे हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. केदारनाथमध्ये धुके साचल्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अपघातानंतर हेलिकॉप्टरचे अवशेष घटनास्थळी विखुरले गेले आहे. घटनास्थळावर मदतकार्य सुरू आहे.

(व्हिडीओ पहा )

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!