नरेडकोमुळे नाशिकच्या लौकिकात भर :गिरीश महाजन 

होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पोचा समारोप,पाच दिवसात ७० हजार नागरिकांची भेट,४५० प्रॉपर्टीचे बुकिंग 

0

नाशिक,दि.२६ डिसेंबर २०२३ –नाशिक शहराचा झपाटयाने विकास होत असतांना नरेडकोच्या माध्यमातून शहरात बांधकाम व्यावसायिकांच्या गृह प्रकल्पांमुळे नाशिकच्या लोैकिकात अधिकच भर पडल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी केले. ‘होमेथॉन २०२३ प्रॉपर्टी एक्स्पो’च्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते.

नरेडकोच्यावतीने डोंगरे वसतीगृह मैदान येथे आयोजित ‘होमेथॉन २०२३ प्रॉपर्टी एक्स्पो’या प्रदर्शनाच्या आज समारोप झाला. यावेळी आमदार देवयानी फरांदे,जिल्हाधिकारी जलज शर्मा, भाजप महानगराध्यक्ष प्रशांत जाधव,जिल्हाध्यक्ष सुनिल बच्छाव, माजी नगरसेवक वर्षा भालेराव,जगदिश पाटील, हेमंत शेटटी, भाजप प्रवक्ते लक्ष्मण सावजी, अजित चव्हाण आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री महाजन यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला.यावेळी बोलतांना महाजन म्हणाले की, मुंबई, पुण्यानंतर वेगाने विकसित होणारे शहर म्हणून नाशिककडे पाहिले जाते. समृध्दी महामार्गामुळे नाशिक मुंबईची कनेक्टिव्हीटी अधिकच वाढली आहे.शहराचा विकास करत असतांना एनएमआरडीच्या विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. तसेच निओ मेट्रो, बाहय रिंगरोड विकसित करण्यात येणार आहे. दोन वर्षांनी होणार्‍या कुंभमेळयाच्यादृष्टीने आतापासून नियोजन सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या माध्यमातून पंढरपूर, शिर्डी, शेगांव आणि त्र्यंबकेश्वर या तीर्थ स्थळांचा विकास होत असून त्र्यंबकेश्वरला कॉरिडॉर करण्याच्यादृष्टीने शासनाने पावले उचलली आहे. कुंभमेळयाच्या पार्श्वभुमीवर शहराच्या विकासाकरीता शासनाकडून निधी मिळणार असून निश्चितपणे या शहराच्या विकासात भर पडेल असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.

नरेडकोच्या माध्यमातून आयोजीत होमेथॉन या प्रदर्शनाला भेट दिली असता इथे १५ लाखांपासून ते १२ कोटीं रूपयांपर्यंतचे फलॅट उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.नाशिकमध्ये १२ कोटीचा फ्लॅट हे एकूण आश्चर्य वाटलेच पण आनंदही झाला. बदलत्या नाशिकचे हे एक उदाहरणच असल्याचे त्यांनी सांगितले.देशातील प्रत्येकाचे स्वतःचे घर असावे असे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. त्यादृष्टीने नरेडकोचीही भूमिका महत्वाची असून नाशिकमध्ये अधिक चांगल्या प्रकारची गृह प्रकल्प साकारत असून यामुळे निश्चितच नाशिकचा लौकिकात भर पडल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलतांना आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या की, नरेडकोच्या माध्यमातून उत्कृष्ट असे गृहप्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले आहे.शहराचा विकास होत असतांना अनेक मोठ मोेठे प्रकल्प उभे राहत आहेत. नरेडकोच्या माध्यमातून अनेक गृहप्रकल्पांचे पर्याय नागरिकांसाठी उपब्ध करून देण्यात आल्याने नरेडको च्या आयोजनाचे त्यांनी कौतूक केले.

प्रदर्शनासाठी मुख्य प्रायोजक म्हणून दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे चेअरमन दीपक चंदे, पॉवर्ड बाय रूंग्ठा बिल्डकॉनचे ललित रूंग्ठा हे लाभले असून सह प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र तसेच एल.आय.सी.हौसिंग तसेच ऑनलाईन पार्टनर म्हणून हौसिंग डॉट कॉमचे सहकार्य लाभले आहे.होमेथॉन प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी  मुख्य समन्वयक जयेश ठक्कर,अध्यक्ष अभय तातेड,सचिव सुनिल गवादे, सह समन्वयक शंतनू देशपांडे,भूषण महाजन सचिव सुनील गवादे यांच्यासह भाविक ठक्कर ,प्रशांत पाटील,पुरुषोतम देशपांडे,राजेंद्र बागड,अश्विन आव्हाड,अविनाश शिरोडे,,शशांक देशपांडे,नितीन सोनवणे,मयूर कपाटे,हर्षल धांडे,अभय नेरकर,भुषण कोठावदे आदींनी परिश्रम घेतले.

७० हजार नागरिकांची भेट
नरेडकोने या प्रदर्शनाच्या निमित्ताने या कालावधीत घर बुक करणारया नागरिकांना चांदीचे नाणे भेट देण्यात आले. तसेच भेट देणारया नागरिकांमधून ‘लकी ड्रॉ’ व्दारे भाग्यवंतास विविध भेट वस्तूही देण्यात आल्या. पाच दिवसीय या प्रदर्शनाला ७० हजार नागरिकांनी भेट दिली तर ४५० प्रॉपर्टीजचे बुकिंग करण्यात आले.

हे ठरले उत्कृष्ठ स्टॉल
या प्रदर्शनात सहभागी स्टॉल धारकांमधून उत्कृष्ठ मांडणीस पुरस्कार देण्यात आले.
 खुल्या जागेत सर्वोत्तम स्टॉलसाठी
दीपक बिल्डस अँड डेव्हलपर्स,
प्रीमियम स्टॉल श्रेणीतील सर्वोत्तम स्टॉलमध्ये
ललित रूंगठा ग्रुप,
वित्त श्रेणीतील स्टॉल्समध्ये 
एचडीएफसी,
एनए भूखंड आणि जमिनीच्या स्टॉल्समध्ये 
भूषण कोठावदे यांचा अर्बन साईटस,
सर्वाधिक विक्री श्रेणीत 
नेरकर प्रॉपर्टी,
बिल्डिंग सप्लायर्स,मटेरियल स्टॉल्समध्ये 
सिटी लिफ्ट
सर्वोत्त्म मार्केटींग

प्रभात कन्स्ट्रक्शनचे

नयन पटेल

 पॅसिफिक बिल्डर्सचे
प्रशांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.