prsanna

नाशिकमध्ये आज ‘होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५’चा भव्य शुभारंभ

१८ ते २१ डिसेंबरदरम्यान डोंगरे वसतिगृह मैदानावर घरखरेदी, गुंतवणूक आणि हरित भविष्यासाठी एकाच छताखाली सुवर्णसंधी

1

नाशिक, दि. १७ डिसेंबर २०२५ – ‘Homethon Property Expo 2025 नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील वर्षातील सर्वात मोठा आणि बहुप्रतीक्षित उपक्रम असलेल्या नरेडको नाशिक आयोजित **‘होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५’**चा आज, गुरुवार दि. १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. डोंगरे वसतिगृह मैदानावर होणाऱ्या या प्रदर्शनासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून, आकर्षक डोम्स, प्रशस्त स्टॉल्स आणि नामांकित बांधकाम व्यावसायिकांची उपस्थिती यामुळे प्रदर्शनाला उत्सवाचे स्वरूप आले आहे.

१८ ते २१ डिसेंबर या चार दिवसांत हे प्रदर्शन सकाळी १० वाजल्यापासून सर्व नाशिककरांसाठी खुले राहणार आहे. विशेष म्हणजे, या प्रदर्शनासाठी कोणतीही प्रवेश फी आकारली जाणार नाही, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून गुंतवणूकदारांपर्यंत प्रत्येकासाठी ही एक खुली संधी ठरणार आहे. घर खरेदी, प्लॉट गुंतवणूक, व्यावसायिक मालमत्ता तसेच रिअल इस्टेटमधील नव्या ट्रेंड्सची सविस्तर माहिती एकाच ठिकाणी मिळणार असल्याचे होमेथॉनचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यांनी सांगितले.

मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन(‘Homethon Property Expo 2025)

आज होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, नाशिक महानगर विकास प्राधिकरण (MMRDA)आयुक्त जलद शर्मा, बीएसएनएलचे महाप्रबंधक सारंग मांडवीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

‘हरित नाशिक’चा संकल्प पर्यावरणासाठी विशेष उपक्रम

यंदाच्या होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पोचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘हरित नाशिक’ ही संकल्पना. रिअल इस्टेट विकासासोबतच पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारत, नरेडको नाशिकने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. प्रदर्शनाला येणाऱ्या प्रत्येक नोंदणीकृत नागरिकामागे एक वृक्ष लावण्याचा निर्धार करण्यात आला आहे. चार दिवसांत जितकी उपस्थिती, तितकी वृक्षलागवडअशा पद्धतीने नाशिक शहर आणि परिसर अधिक हिरवागार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.या उपक्रमाबाबत नरेडको नाशिकचे सचिव शंतनू देशपांडे म्हणाले, “रिअल इस्टेटची प्रगती करत असताना पर्यावरणाचे रक्षण करणे तितकेच आवश्यक आहे. होमेथॉनच्या माध्यमातून नाशिकच्या विकासासोबत हरित भविष्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

घरखरेदीदारांसाठी आकर्षक ऑफर्स(‘Homethon Property Expo 2025)

होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५ मध्ये घरखरेदीदारांसाठी अनेक खास सवलती आणि ऑफर्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. *४.९९ टक्के गृहकर्ज दरासारखी विशेष ऑफर, तसेच ऑन-द-स्पॉट बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी चांदीचे नाणे भेट हे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे*याशिवाय, एकाच छताखाली ५०० पेक्षा अधिक निवासीव्यावसायिक प्रकल्प पाहण्याची, तुलना करण्याची आणि तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. १८ लाखांपासून ते तब्बल १२ कोटी रुपयांपर्यंत विविध बजेटमधील पर्याय उपलब्ध असल्याने, प्रत्येक वर्गातील ग्राहकांसाठी हा एक्स्पो उपयुक्त ठरणार आहे.

गुंतवणुकीसाठी नाशिक योग्य वेळ, योग्य ठिकाण

मागील काही वर्षांत नाशिकमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नाशिकबाहेरील शहरांमधूनही येथे घर खरेदी करण्याचा कल वाढताना दिसत आहे. यामुळे शहराच्या अर्थकारणात बांधकाम क्षेत्राचे योगदान लक्षणीयरीत्या वाढले आहे. प्रॉपर्टी तज्ज्ञांच्या मते, भविष्यातील विकासाचा विचार करता नाशिकमध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. घर व प्लॉटमधील गुंतवणूक दीर्घकालीन आणि सुरक्षित परतावा देणारी ठरत असल्याने या क्षेत्राकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढत आहे.अशी माहिती नरेडकोच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष सुनील गवादे यांनी दिली.

श्रुती मराठे होमेथॉनची ब्रँड अँबेसिडर

‘होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५’ची ब्रँड अँबेसिडर म्हणून प्रसिद्ध मराठी अभिनेत्री श्रुती मराठे यांची निवड करण्यात आली आहे. नरेडकोच्या उपक्रमाची विश्वसनीयता आणि सकारात्मक संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्या करणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे प्रदर्शनाची प्रभावीता वाढणार असून, घरखरेदी करणाऱ्या ग्राहकांशी सशक्त संवाद साधण्यास मदत होणार आहे.

मोठ्या उपस्थितीची अपेक्षा

मागील दोन होमेथॉन प्रदर्शनांना लाखो नागरिकांनी भेट दिली होती. यंदा ही संख्या आणखी वाढेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून घरखरेदीदार, गुंतवणूकदार आणि रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.एकूणच, होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५ हे नाशिककरांसाठी घर खरेदीची सुवर्णसंधी, गुंतवणुकीचा विश्वासार्ह मंच आणि पर्यावरण संवर्धनाचा ठोस संदेश देणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. नरेडकोच्या वतीने जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत प्रदर्शनाला भेट देऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘Homethon Property Expo 2025’ grand inauguration in Nashik today

नरेडको नाशिक विश्वासार्ह रिअल इस्टेट संघटना

नरेडको नाशिक (NAREDCO Nashik) ही नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलची नाशिकमधील अधिकृत शाखा आहे. नाशिक शहरातील बांधकाम व्यावसायिक, विकासक आणि रिअल इस्टेट क्षेत्राशी निगडित घटकांना एकत्र आणून शहराच्या विकासासाठी काम करणे, हा नरेडकोचा मुख्य उद्देश आहे. पारदर्शक व्यवहार, ग्राहकहित, तसेच शासकीय धोरणांमध्ये सकारात्मक सहभाग यावर नरेडको भर देत आहे. नाशिकमधील रिअल इस्टेट उद्योगाला योग्य व्यासपीठ मिळावे, विकासक व ग्राहक यांच्यात थेट संवाद साधला जावा आणि घरखरेदी प्रक्रियेत विश्वास वाढावा, यासाठी नरेडको नाशिककडून दरवर्षी होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पोसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकच्या विकासाला वेग

आगामी सिंहस्थ कुंभमेळा नाशिकसाठी विकासाची मोठी पर्वणी ठरत आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला जात आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नाशिक महानगरपालिका यांच्याकडून रस्ते, पूल, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता व इतर नागरी सुविधांवर मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे.पायाभूत सुविधा वाढल्या की त्या परिसरातील मालमत्तेच्या किमती वाढणे हे स्वाभाविक आहे. त्यामुळे कुंभमेळ्यापूर्वी घर खरेदी करणे किंवा गुंतवणूक करणे भविष्यात फायदेशीर ठरू शकते, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५ नाशिककरांसाठी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.असे ही मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यांनी सांगितले.

नाशिक आजही माफक दरातील घरांचे शहर

आजही नाशिकमध्ये इतर महानगरांच्या तुलनेत घरांचे दर तुलनेने कमी आहेत. १५ ते २० लाखांच्या दरम्यान १ बीएचके फ्लॅट्स उपलब्ध आहेत, तसेच ४ ते ७ रूम किचन या फ्लॅट ला सुद्धा ग्राहकांची अधिक पसंती आहे,.अशी माहिती होमेथॉनचे सचिव शंतनु देशपांडे यांनी दिली. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी नाशिक हे घरखरेदीसाठी आकर्षक ठिकाण बनले आहे.शहराच्या मध्यवर्ती भागाबरोबरच गोविंदनगर, गंगापूर रोड, सोमेश्वर, नवश्या गणपती, सिडको, पंचवटी आदी भागांमध्येही घरखरेदीकडे नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे.

ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स आणि ५००हून अधिक प्रोजेक्ट्स

होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५ मध्ये ग्राहकांना अनेक आकर्षक संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ४.९९ टक्के गृहकर्ज दरासारखी विशेष ऑफर ही या एक्स्पोची प्रमुख वैशिष्ट्ये असणार आहेत. यासोबतच, एकाच छताखाली ५०० पेक्षा अधिक निवासी व व्यावसायिक प्रोजेक्ट्स पाहण्याची व तुलना करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.नाशिकसह महाराष्ट्रातील विविध भागांतील प्रोजेक्ट्सची माहिती या एक्स्पोमध्ये उपलब्ध असणार असून, ग्राहकांना त्यांच्या बजेटनुसार आणि गरजेनुसार घर निवडणे सोपे होणार आहे. एखादा प्रोजेक्ट आवडल्यास, संबंधित बिल्डरकडून त्या प्रोजेक्टची साईट व्हिजिटची सुविधाही देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सामाजिक बांधिलकी जपत आयोजन

नरेडको नाशिककडून सामाजिक बांधिलकी जपत या एक्स्पोमध्ये आदिवासी विकास मंडळाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या **‘साबरी प्रॉडक्ट्स’**चा समावेश आहे. यामुळे स्थानिक व आदिवासी उत्पादनांना बाजारपेठ मिळणार आहे.तसेच, BSNL कडून एक्स्पो परिसरात मोफत वाय-फायसह विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, ज्यामुळे नागरिकांना अधिक सोयीस्कर अनुभव मिळणार आहे.

नाशिकच्या रिअल इस्टेटला नवी उंची

नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. शहरात ४० पेक्षा अधिक मजल्यांच्या इमारतींचे प्रोजेक्ट्स साकारत असून, अशा मोठ्या आणि आधुनिक प्रोजेक्ट्सना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाशिक आता पारंपरिक शहरातून आधुनिक रिअल इस्टेट हबकडे वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत आहे.

नाशिकच्या विकासाचा नवा अध्याय

ग्राहकांना एकाच ठिकाणी घरखरेदीसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देणे, पारदर्शक व्यवहारांना प्रोत्साहन देणे आणि नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्राला अधिक बळकटी देणे, हा यावर्षीच्या नरेडको होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५चा मुख्य उद्देश असल्याचे सहसमन्वयक उदय शहा (पाटील शहा हाऊसिंग कॉर्पोरेशन) यांनी सांगितले.नाशिकच्या विकासाचा नवा अध्याय लिहिणाऱ्या या भव्य गृहप्रदर्शनाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले असून, होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५ नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्राला नवी दिशा देईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

स्पॉन्सर्सची भक्कम साथ

या वर्षीच्या होमेथॉन एक्स्पोला खालील प्रमुख स्पॉन्सर्सचे सहकार्य लाभले आहे

Title Sponsor: Deepak Builder and Developers

Co-powered by: Abh Developers & Lalit Roongta Group

Bathing Partner: Jaquar & Ceramic Traders

Virtual Reality Partner: The VR Company

Communication partner manhun BSNL असणार आहे.

प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी मोठी टीम प्रयत्नशील

प्रदर्शनाचे समन्वयक जयेश ठक्कर, अध्यक्ष सुनील गवादे सहसमन्वयक उदय शाह, मार्जियान पटेल, अभय नेरकर, चेअरमन अभय तातेड, सचिव शंतनू देशपांडे, खजिनदार भूषण महाजन यांच्यासह मोठी टीम या आयोजनासाठी काम करत आहे.या व्यतिरिक्त भाविक ठक्कर, पुरुषोत्तम देशपांडे, हर्षल धांडे, प्रसन्न सायखेकर, प्रशांत पाटील,मुकुंद साबु, पंकज जाधव, ताराचंद गुप्ता, परेश शहा, राजेंद्र बागड, मयूर कपाटे, नितीन सोनावणे, शशांक देशपांडे आदी सदस्य परिश्रम घेत आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!