निमा पॉवर प्रदर्शनाच्या स्टॉल्स बुकिंला भरघोस प्रतिसाद ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन
ऊर्जा बचत उपकरणे,विद्युत सुरक्षा,रोबोट,सोलर,एलईडी, एअरक्राफ्ट हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण
इलेक्ट्रिकल- इलेक्ट्रॉनिक क्लस्टरसाठी प्रयत्नशील – ना. भुसे
नाशिक,दि.६ मे २०२३ – येत्या १९ ते २२ मे दरम्यान निमा कार्यालयासमोरील आयटीआय, सातपूर येथील मैदानावर, निमा आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचनालाय(महाराष्ट्र शासन)यांच्या सहकार्याने आयोजित “निमा पॉवर २०२३” या औद्योगिक प्रदर्शनात सहभागासाठी इलेक्ट्रिकल, इलेक्रॉनिक्स,आयटीसह संलग्न विविध उत्पादक व व्यवसायिकांचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे. उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे तसेच नाशिकला इलेक्ट्रिकल- इलेक्ट्रॉनिक क्लस्टर व्हावे या मागणीचा शासन दरबारी पाठपुरावा करू, असे आश्वासन पालकमंत्री ना. दादा भुसे यांनी दिले.या प्रदर्शनाला उद्योग मंत्री ना.उदय सावंत व पालकमंत्री ना.दादा भुसे यांनी सदर उपक्रमाचे कौतुक करीत उद्घाटनासाठी उपस्थित राहण्याचे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनासुद्धा या कार्यक्रमासाठी आणण्याचे आश्वासन दिले आहे.
गेल्या महिन्याभरात जवळपास ८० टक्क्यांपेक्षा अधिक स्टॉल्सचे बुकिंग झाले आहे. आतापर्यंत पुणे, मुंबई, चेन्नई, बंगलोर,अहमदाबाद,दिल्लीसह राज्यातील अनेक जिल्ह्यातून लहान मोठ्या उद्योगासह विविध स्टार्टअपने सहभाग नोंदविला आहे.सदरचे प्रदर्शन म्हणजे विद्युत क्षेत्राचा कुंभमेळा ठरेल,असा विश्वास निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे,मानद सचिव राजेंद्र आहिरे व प्रदर्शन चेअरमन मिलिंद राजपूत यांनी व्यक्त केला.
निमा पॉवर प्रदर्शन यावेळी दशकपूर्ती वर्ष साजरे करीत असून केंद्रीय विद्युत संशोधन संस्था सीपीआरआयच्या नाशिक शाखेच्या गुंतवणुकीच्या यशानंतर इलेक्ट्रॉनिक्स तथा इलेक्ट्रिकल क्लस्टर नाशिकला मंजुरीसाठी निमा व एमआयडीसीचे सामूहिक प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे सदर प्रदर्शनाला आगळे महत्व प्राप्त झाले आहे.
विद्युत क्षेत्रातील मोठे प्रकल्प नाशकात येण्याच्यादृष्टीने निमा पॉवर प्रदर्शन मैलाचा दगड ठरेल,अशी भावना सर्व प्रयोजकांनी व्यक्त केली आहे.आतापर्यंत टीडीके,स्मार्ट सोल्यूशन लि.थायसन,एचएएल, आकांक्षा पॉवर इन्फ्रा,नेक्स्टस्टेप मल्टीपार्किंग,नारखेडे उद्योग, डब्ल्यूआर सोलर,मोंक ऑटोमेशन, बेदमुथा ग्रुप,अनुप्रिया इंडस्ट्रीज सह अनेक उद्योग प्रयोजकत्वात सहभागी होणार आहेत.
ऊर्जा बचत उपकरणे,विद्युत सुरक्षा,रोबोट,सोलर,एलईडी, ब्रेकर,ट्रान्सफॉर्मर,इलेक्ट्रॉमेक्निक लिफट, क्रेन,यूपीएस,स्टॅबिलायझर, आयओटी तंत्रज्ञानाची उपकरणे, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आदींसह एचएएलचे इंडीजींनीयस सुट्या भागांसह एअरक्राफ्ट हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असणार आहे.
प्रदर्शन यशस्वीतेसाठी निमाचे उपाध्यक्ष किशोर राठी,आशिष नहार,खजिनदार विरल ठक्कर,हर्षद ब्राम्हणकर,नितीन वागस्कर, शशांक मणेरीकर, प्रवीण वाबळे,किरण वाजे,दिलीप वाघ,कैलास पाटील गोविंद झा,संदीप भदाणे,जयंत जोगळेकर, रवींद्र झोपे, राजेंद्र वडनेरे, विराज गडकरी,संजय राठी,हेमंत खोंड,वैभव जोशी, संजय सोनवणे,श्रीधर व्यवहारे,जितेंद्र आहेर, मनीष रावळ,श्रीकांत पाटील,रवी शामदासानी,एस.के.नायर,सुधीर बडगुजर,सुरेंद्र मिश्रा,सतीश कोठारी , रावसाहेब रकिबे,प्रशांत जोशी, जयदीप राजपूत, मंगेश काठे, वेंकटेश मूर्ती,परमानंद नेहे,विश्र्वास शिंपी, बाळासाहेब जाधव, किरण लोणे, विश्वजित निकम आदी प्रयत्नशील आहेत.
मुख्यमंत्री उद्घाटनास येणार !
उद्योग मंत्री ना.उदय सावंत व पालकमंत्री ना.दादा भुसे यांनी सदर उपक्रमाचे कौतुक करीत उद्घाटनासाठी उपस्थित राहण्याचे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनासुद्धा या कार्यक्रमासाठी आणण्याचे आश्वासन दिले आहे.