धक्कादायक घटना : पत्नीची हत्या करून पती स्वतःच पोलीस ठाण्यात हजर

चारित्र्याच्या संशयातून टोकाचा निर्णय?: धक्कादायक कबुलीनंतर पोलिसही चक्रावले

0

नाशिक | १५ मार्च २०२६- husband killed wife news चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी पती स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला. “मी माझ्या बायकोची हत्या करून आलो आहे,” असे सांगत त्याने पोलिसांसमोर कबुली दिल्याने काही काळ पोलिसही चक्रावून गेले होते.

मिळालेल्या माहितीनुसार,नाशिक येथील सरकारवाडा पोलीस ठाण्यात एक व्यक्ती आपल्या भावाला घेऊन आला.त्याने पोलिसांना सांगितले, “माझा भाऊ काय सांगतो ते तुम्ही ऐका.” त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीची चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान त्याने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक कबुली दिली.(husband killed wife news)आरोपीने सांगितले की, त्याचा पत्नीशी काही दिवसांपासून वाद सुरू होता. त्यानंतर तो कल्याण परिसरात गेला आणि पत्नी राहत असलेल्या घरात जाऊन तिचा गळा आवळून खून केला. ही माहिती ऐकून पोलिसही काही काळ स्तब्ध झाले.

घटनेची खात्री करण्यासाठी नाशिक पोलिसांनी तातडीने कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यानंतर स्थानिक पोलिसांचे पथक आरोपीने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचले. तेव्हा घरात एक महिला मृतावस्थेत आढळून आली. तपासात मृत महिलेची ओळख आरोपीची पत्नी असल्याचे स्पष्ट झाले.प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. दोघांना दोन मुले असून त्यापैकी एक मूल वडिलांकडे तर दुसरे मूल आईकडे राहत असल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे संतापाच्या भरात आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली त्याने दिली आहे.

घटनेच्या दिवशी आरोपी अनेक दिवसांनी घरी आल्याने घरात जेवणाचा बेत करण्यात आला होता. जेवणानंतर तो मुलाला नातेवाईकांकडे सोडून पुन्हा पत्नीच्या घरी गेला. त्यानंतर त्या रात्री दोघांमध्ये नेमका काय वाद झाला आणि परिस्थिती इतकी टोकाला कशी पोहोचली, याचा तपास पोलिस करत आहेत.दरम्यान, घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शेजाऱ्यांच्या माहितीनुसार, मृत महिला स्वभावाने शांत आणि प्रेमळ होती. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!