संजयचा मला अभिमान, राऊतांच्या ईडी अटकेवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद बघा ..
मुंबई – शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज संजय राऊत यांच्या घरी जाऊन राऊतांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. त्यानंतर तातडीची पत्रकार परिषद घेत त्यांनी भाजपवर पुन्हा हल्लाबोल चढवला आहे. तसेच भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनाही ललकारलं आहे.
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले .. संजय राऊतां बद्दल मला नक्कीच अभिमान आहे. संजय माझा जुना मित्र आहे. मी त्याच्या कुटुंबीयांना भेटलो. गुन्हा काय संजयचा. पत्रकार आहे. शिवसैनिक आहे. निर्भिड आहे. जे पटत नाही ते बोलतोय. मरण आलं तरी शरण जाणार नाही. हे त्याचं वाक्य चांगलं आहे. तोही शरण जाऊ शकला असता. जे शरण झाले हमाममध्ये गेले आंघोळीला गेले. जोपर्यंत सत्तेचा फेस अंगावर आहे तोपर्यंत गेलेले आमच्यावर टीका करू शकतात. फेस गेल्यावर परिस्थितीची जाणीव होईल. त्यानतंर फेस उतरला तर ते काय आहेत हे लोकांसमोर येईल, अशी पहिली प्रतिक्रिया ठाकरेंनी दिली आहे.
या मोठ्या घडामोडीनंतर उद्धव हे सध्या पत्रकार परिषद घेत आहेत. बघा, ते काय म्हणत आहेत…..
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची पत्रकार परिषद – LIVE
https://t.co/FwyNWfuAaP— ShivSena – शिवसेना (@ShivSena) August 1, 2022