नाशिक,११ मार्च २०२३ – काही दिवपासून वाहतूक नियमात मोठे बदल होत आहेत. मध्यंतरीच नवीन कार मध्ये सहा एअर बॅग बंधनकारक करण्यात आल्या होत्या आता अति वेगाने वाहन चालविल्याने स्त्यावर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी स्पीड लॉक अर्थात स्पीड गव्हर्नर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय शासनाने काही वर्षांपूर्वी घेतलेला होता त्याची अंमलबजावणी (दि. १) मार्चपासून सुरू झाली आहे.
त्यामुळे नाशिक आरटीओ विभागाने स्पीड गव्हर्नर नसलेल्या अंदाजे दोनशेहून अधिक वाहनांचे पासिंग रोखले आहे. वाहनांना स्पीड गव्हर्नर (वेग नियंत्रक) बसविण्याचा निर्णय शासनाने २०१६ मध्ये घेतला आहे. आता १ मार्चपासून वेग नियंत्रक उत्पादक वा फिटिंग करणाऱ्या कंपन्यांनी ऑनलाइन प्रमाणपत्र अपलोड करून ते आरटीओला लिंक करायचे आहे.
१ मार्चपासून अंमलबजावणी सुरु
शासनाने आता स्पीड गव्हर्नरबाबत अंमलबजावणी सुरु केली असून ज्या वाहनांना स्पीड गव्हर्नर नाही, अशा वाहनांची पासिंग होणार नाही. नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्पीड लॉक बसविणे बंधनकारक असल्याची माहिती नसलेल्या दोनशेहून अधिक वाह- नधारकांना वाहन पासिंग न करताच परतावे लागले आहे. स्पीड लॉक असेल तरच वाहनाचे पासिंग वाढत्या अपघातांवर आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने सर्व वाहनांना स्पीड गव्हर्नर (वेग नियंत्रक) बंधनकारक करण्यात आले आहे. वाहनांना स्पीड गव्हर्नर बसविले नसेल तर अशा वाहनांचे पासिंग होत नाही. आरटीओने अनेक वाहने परत पाठविली आहेत
वाहन संबंधित कामासाठी आता वाहनधारकांना ऑनलाइन अपॉइंटमेंट घ्यावी लागते, त्यानंतर आरटीओ कार्यालयात यावे लागते. ज्या वाहनांना स्पीड गव्हर्नर बसविलेले नाही, अशा वाहन- धारकांनी वाहनसंबंधी कामासाठी (पासिंग) अपॉइंटमेंट वाया जाते.. वाहनधारकांची फसवणूक होऊ नये, यासाठी परिवहन विभागाने (दि. १) मार्चपासून वेग नियंत्रक बसविण्याचे काम प्रणालीमार्फत ऑनलाइन सुरु केले आहे. सर्व वाहनधारकांनी अधिकृत प्रणाली मान्यता प्राप्त वेग नियंत्रक यांच्याकडून बसवून घेत गैरसोय टाळावी तसेच रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करून अपघात टाळावे.असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत यांनी सांगितले आहे.