नवी दिल्ली ,२८ऑगस्ट २०२२- नोएडातील अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर अखेर जमीनदोस्त झालं आहे.३६०० किलो पेक्षा जास्त स्फोटकं वापरून ही इमारत काही सेकंदात जमीनदोस्त करण्यात आली आहे. इमारत जमीदोस्त करणार याची बरेच दिवसांपासून चर्चा होती. आता शेवटी ट्विन टॉवर दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी हा टॉवर पाडण्यात आला आहे. काही सेकंदामध्ये हे बहुमजली टॉवर्स कोसळले.यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचं साम्राज्य पसरलं होतं.
एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचं काम देण्यात आलं होतं. हे ट्विन टॉवर्स पाडण्यासाठी ४६ जणांची टीम तयार करण्यात आली. ही टीम दररोज सुमारे १२ तास स्फोटकं लावण्याचं काम करत होती. स्फोटकांच्या मदतीनं अवघ्या तीन मिनिटांत एपेक्स आणि सायन नावाचे हे दोन टॉवर जमीनदोस्त झाले. विशेष म्हणजे, बहुमजली टॉवर्स पाडल्यानंतर ३० मीटर उंचीपर्यंत याचा ढिगारा तयार झाला.हे टॉवर्स पाडल्यानंतर परिसरात शेकडो मीटरपर्यंत धुळीचे लोट पसरले होते.
ट्विन टॉवरच्या अवैध बांधकामाविरोधातील प्रकरण सर्वात आधी आरडब्लूए नोएडा अथॉरिटीकडे पोहोचलं. उदय भान सिंह म्हणतात की, प्राधिकरणानं या प्रकरणात बिल्डरला पाठिंबा दिला. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं आणि २०१४ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयानं टॉवर पाडण्याचे आदेश दिले. या प्रकरणी १ सप्टेंबर रोजी प्राधिकरणाच्या सीईओंनी समिती स्थापन केली असून, २६ तासांत ट्विन टॉवरशी संबंधित तपास अहवाल समोर आला आहे. यामध्ये १२ ते १५ अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आलं असून, उच्चस्तरीय एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले होते. वर्ष २०२१ मध्ये सखोल तपासानंतर, त्यांनी आपला अहवाल सरकारला सादर केला आणि त्यानंतर ४ ऑक्टोबर २०२१ रोजी, या अहवालाच्या आधारे, नोएडा प्राधिकरणाच्या २४ अधिकारी आणि कर्मचार्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला.
#WATCH उत्तर प्रदेश: नोएडा के सुपरटेक ट्विन टावरों को गिराया गया। pic.twitter.com/c5895lgn2Q
— ANI_HindiNews (@AHindinews) August 28, 2022