महाराष्ट्रात २८ ते ३१ जुलै दरम्यान या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता

हवामान साक्षरता अभियान चे मुख्य प्रबंधक राहुल पाटील यांची माहिती

0

सांगली,दि. २७ जुलै २०२३ – महाराष्ट्रात दि. २८ ते ३१ जुलै पर्यंत कोकणात व सह्याद्री पर्वत रांगामधील पुर्व उतारावरील सगळे तालुके तसेच नागपूर पलीकडील दोन ते चार जिल्ह्यांमध्येच जोर दार पाऊस होण्याची शक्यता आहे.अशी माहिती हवामान साक्षरता अभियानाचे मुख्य प्रबंधक राहुल पाटील यांनी जनस्थानशी बोलतांना दिली

कोकणातील सिंधुदुर्ग,रत्नागिरी,रायगड,मुंबई व मुंबई उपनगर,ठाणे,पालघर या जिल्ह्यांमधील बहुतेक सगळ्या तालुक्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.काही ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही.असं हि पाटील म्हणाले

In Maharashtra, there is a possibility of heavy rain in this district from 28th to 31st July

सह्याद्रीच्या रांगाना लागून असलेल्या पुर्व उतारावरील जिल्ह्यांमधील म्हणजेच कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,नाशिक या जिल्ह्यातील पश्चिम बाजूस असलेल्या तालुक्यात मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे

विदर्भातील नागपूर, चंद्रपूर,यवतमाळ,वर्धा या जिल्ह्यांमधील बहुतेक तालुक्यात चांगल्या दमदार पावसाची शक्यता आहे.पण भंडारा,गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.गडचिरोलीतील काही तालुक्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उर्वरित पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे पश्चिम विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचाच पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु ३१ जुलै नंतर पावसाचा जोर कमी होईल असे हि राहुल पाटील यांनी अंदाज व्यक्त केला आहे

In Maharashtra, there is a possibility of heavy rain in this district from 28th to 31st July

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.