नाशिक शहरात गुरुवारी ‘या’ भागातील पाणीपुरवठा बंद 

0

नाशिक,१ नोव्हेंबर २०२२ – नाशिक रोड विभागातील फिल्टर येथील स्वातंत्र्यसैनिक कंपाउंड मधील गोदावरी जलकुंभ भरणारी पंपाची (मुख्य उर्ध्ववाहीनी) पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली आहे. या  गळतीचे काम करण्यासाठी खालील प्रभागातील एक दिवसाचा पाणी पुरवठा गुरुवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी  बंद असणार आहे.अशी माहिती कार्यकारी अभियंता,सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग (पाणी पुरवठा)नाशिक महानगरपालिका  यांनी कळवली आहे .

गुरुवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी  प्रभाग क्र  १७- कॅनोल रोड परीसर, नारायण बापू नगर, चंपानगरी, गोदावरी सोसा.,दसक गाव, शिवाजी नगर, एम.एस.सी.बी कॉलनी, तिरुपती नगर, टाकळी रोड परिसर, भिमनगर परिसर, प्रभाग क्र.१८- शिवाजी नगर,मॉडेल कॉलनी, अयोध्या कॉलनी, पवारवाडी , इंगळे चौक, पंचक गांव सायखेडा रोड, भगवा चौक, शिवशक्ती नगर. प्रभाग क्र.१९- गोरेवाडी, प्रभाग क्र.२०- पुनारोड परीसर, राम नगर, विजय नगर, शाहु नगर, लोकमान्य नगर, मोटवाणी रोड, कला नगर, आशा नगर, जिजामाता नगर,  गुरुवार दिनांक 03/11/2022 रोजी सायंकाळचा पाणी पुरवठा खालील प्रभागात होऊ शकणार नाही व शुक्रवार दिनांक ०४ नोव्हेंबर २०२२  रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल याची येथील नागरीकांनी नोंद घ्यावी  अशी माहिती नाशिक महानगर पालिकेतर्फे कळविण्यात आली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!