मुंबय,दि,२९ नोव्हेंबर २०२४-विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आघाडीने मोठं यश मिळवलं. मोठ्या प्रमाणावर जागा जिंकून पुन्हा एकदा राज्यात महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे. त्यासाठीच्या हालचाली देखील सुरू आहेत, मुख्यमंत्री, पदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून लवकरच त्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. नव्या सरकारमध्ये ४ महिला आमदारांना मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती आहे. भाजपकडून यंदा विधान सभेवर १४ महिला आमदार निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादीच्या ४ तर शिवसेनाकडून २ आमदार विधानसभेवर निवडून आल्या आहेत.
निवडून आलेल्या १४ आमदारांपैकी ४ महिला आमदारांची मंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागच्या २ टर्म पेक्षा अधिक काळ भाजपचा गड राखून ठेवलेल्या महिला आमदारांची मंत्री मंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. मंत्री पदे देण्याच्या अनुषंगाने महिला आमदारांचे प्रोफाइल दिल्लीत मागविले असल्याची माहिती आहे.
यामध्ये अदिती तटकरे यांचे नाव प्रामुख्याने घेतलं जात आहे. याआधी देखील मंत्रिमंडळात त्यांच्याकडे महिला व बालविकास खात राहिलं आहे, तर दुसरीकडे नाशिक मध्य मतदार संघातून निवडून आलेल्या देवयानी फरांदे (Devyani Farande) त्यांच्या सुद्धा नावाची चर्चा आहे. त्याचबरोबर श्वेता महाले या देखील भाजपाच्या आमदार आहेत. त्यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणखी एका महिला आमदाराचं नाव चर्चेत आहे. तर शिवसेनेकडून एक महिला आमदार नाव चर्चेत असल्याची माहिती आहे.