नरेडकोच्या “होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो” चे उद्घाटन : काही तासातच ५४ घरांचे बुकिंग
आगामी काळात बांधकाम व्यवसायिकांच्या सहकार्याने नाशिकच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागणार ! : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीची आज प्रदर्शनात विशेष उपस्थिती
प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीची आज प्रदर्शनात विशेष उपस्थिती
नाशिक, दि. २३ डिसेंबर २०२२ – आगामी काळात सिंहस्थ कुंभमेळा होणार असून या निमित्ताने शहराच्या विकासाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. यामध्ये सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून त्यात बांधकाम व्यावसायिकांचा मोठा वाटा असणार आहे. किंबहुना नाशिकच्या सर्वांगीन विकासात त्यांचा मोठा हातभार लागणार असून त्यात नरेडकोच्या सर्व पदाधिकारी व अन्य बांधकाम व्यवसायिक याकरिता निश्चित प्रयत्न करतील, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.
सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे दि. २२ ते २५ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ असे चार दिवसांचे ‘होमेथॉन प्रदर्शन ‘ नाशिक शहरातील गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे दि. गुरूवार २२ रोजी शानदार उद्घाटन संपन्न झाले .
या प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. त्यानंतर आयोजित उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, सिटी लिफ्टचे संचालक नवीन राजगोपालन, युनीयन बँकेचे जनरल मॅनेजर राजीव पट्टनायक, मुद्रांक शुल्क विभागाचे जिल्हाधिकारी कैलास दवंगे आदि मान्यवर उपस्थित होते. व्यासपीठावर नरेडको नाशिकचे अभय तातेड, नरेडको सचिव सुनील गवादे, होमेथॉनचे समन्वयक जयेश ठक्कर , होमेथॉनचे सहसमन्वयक शंतनु देशपांडे, प्रदर्शनाचे प्रायोजक व दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी उद्घाटन कार्यक्रमात बोलताना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, नाशिकचे पर्यावरण अत्यंत उत्कृष्ट असून शहर व परिसरामध्ये आगामी काळात मोठमोठे बांधकाम प्रकल्प उभे राहणार आहेत. त्यामुळे नाशिकच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून शहराचे पायाभूत सुविधा तयार करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. नाशिकमध्ये अन्य शहरांप्रमाणे अनधिकृत इमारती नाहीत, नाशकात ५०० पेक्षा जास्त गृहप्रकल्प सुरू आहेत. यावरून नाशिकला घरांची मोठया प्रमाणात मागणी आहे आणि नाशकातून शासनाला याद्वारे मोठयप्रमाणात मुद्रांक शुल्क उपलब्ध होत असल्याचे निदर्शनास येते. रिअल इस्टेट क्षेत्रातील विकासाचा हा दर असाच दीर्घकाळ कायम राहावा, यासाठी सर्वांनीच प्रयत्नशील राहावे.
मध्यंतरी कपाटामुळे अनेक प्रकल्प अडकले होते.सर्वांना एकत्रित बसून हा प्रश्न मार्गी लावला. पार्किंगचा मुद्दासुद्धा निकाली निघाला असून बांधकाम व्यावसायिकांचे शासन स्तरावरील सर्व प्रश्न सोडविण्याचा आपण कसोशीने प्रयत्न करू. रिंगरोडबाबत चर्चा सुरू असून तो प्रश्नही लवकरच सुटेल. आगामी कुंभमेळ्याचे नियोजन आतापासूनच सुरू झाले असून त्यात आधुनिक तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणात भर दिला जाईल,एमएमआरडीएचा असलेला मुद्दा शासन स्तरावरून सोडविला जाईल,असेही त्यांनी सांगितले. तसेच येथील बांधकाम व्यावसायिक सर्वांसाठीच चांगल्या प्रकारची घरे उपलब्ध करून देतात. या प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न साकार होणार आहे. परंतु कोणतेही प्रकल्प उभे करताना पर्यावरणाचे रक्षण व्हावे, त्याचप्रमाणे यापुढे घरांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्यात यावी, असे गमे यांनी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी नाशिक महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले की, सर्वसामान्यांना आपले स्वतःचे सुंदर घर असावे, असे वाटते, या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे. या ठिकाणी स्वप्नातील घर निवडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत असून ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या नवीन नियमावलीनुसार घरे उपलब्ध करून द्यावीत याकरिता महापालिकेच्या वतीने लवकरच शहरातील सर्व बांधकाम व्यवसायिकांची आपण बैठक घेऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून नाशिकच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचे कार्य असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी मनोगत व्यक्त केले. कोविड काळात मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्यात आल्याने बांधकाम व्यवसायिकांनाआणि ग्राहकांना मोठा फायदा झाला, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी युनीयन बँकेचे जनरल मॅनेजर राजीव पट्टनायक यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक जयेश ठक्कर यांनी केले. तर मनोगतात अभय तातेड यांनी या प्रदर्शनाबाबत माहिती दिली. सर्वांच्या सहकाऱ्यांनी हे प्रदर्शन आम्ही उभे करू शकलो, असे त्यांनी सांगितले. तर सुनील गवादे यांनी आम्ही नरेडकोचे सभासद होण्याकरिता अत्यंत काटेकर नियमावलीचे पालन करतो, त्याचप्रमाणे या प्रदर्शनात पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर नरेडकोचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन बांदेलकर यांची शुभेछा क्लिप दाखविण्यात आली. तसेच याप्रसंगी अभय तातेड, जयेश ठक्कर, सुनील गवादे, शंतनु देशपांडे, पुरुषोत्तम देशपांडे, अमित रोहमारे, भूषण महाजन, दीपक चंदे यांच्या हस्ते नाशिक महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, सिटी लिफ्टचे संचालक नवीन राजगोपालन, युनीयन बँकेचे जनरल मॅनेजर राजीव पट्टनायक, मुद्रांक शुल्क विभागाचे जिल्हाधिकारी कैलास दवंगे, नवीन राजगोपालन, सौरभ देसाई, प्रियंका यादव आदि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीची आज प्रदर्शनात विशेष उपस्थिती
नरेडकोच्या होमथॉन एक्स्पो २०२२ या प्रदर्शनाची ब्रँड ॲबेसॅडर व अभिनेत्री प्राजक्ता माळी या देखील या प्रदर्शनाला शुक्रवार, दि. २३रोजी सांयकाळी ५ वाजता भेट देणार आहे. त्यानंतर निर्मिती अॅडव्हर्टायझिंगचे संचालक नंदन दीक्षित व निवेदिका किशोरी किणीकर हे अभिनेत्री प्राजक्ता माळी हिची प्रकट मुलाखत घेणार आहेत.
याप्रसंगी कार्यक्रमास नरेडको मुंबईचे उपाध्यक्ष हितेश ठक्कर, सहकोषाध्यक्ष मौलिक दवे, नरेडको औरंगाबादचे अध्यक्ष रमेश नागपाल, खजिनदार सचिन जोशी, निळकंठ नागपाल, नरेडको नाशिकचे राजन दर्याणी, प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक नेमीचंद पोद्दार, कृणाल पाटील, सुरेश पाटील हितेश पोद्दार, युनियन बँकेचे सुमेर सिंग, कुलदीप चावरे, दिनेश भामरे, अॅड. अजय निकम. अॅड. मनीष चिंधडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मिती अॅडव्हर्टायझिंगचे संचालक नंदन दीक्षित व निवेदिका किशोरी किणीकर यांनी केलेे, तर होमेथॉनचे सहसमन्वयक शंतनु देशपांडे यांनी आभार मानले.
तसेच नरेडकोच्या होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो २०२२ “यशस्वी होण्यासाठी अविनाश शिरोडे, पुरुषोत्तम देशपांडे, भाविक ठक्कर,अश्विन आव्हाड, श्रीहर्ष घुगे, प्रशांत पाटील, नितीन पाटील, मयूर कपाटे, भूषण महाजन,राजेंद्र बागड प्रयत्नशील आहेत.विशेष म्हणजे या प्रदर्शनासाठी भाविक ठक्कर यांनी मोलाची जबाबदारी पार पाडत आहेत.
प्रदर्शनात उद्घाटनानंतर काही तासातच एकूण ५४ घरांचे बुकिंग
नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे ‘होमेथॉन प्रदर्शन ‘ नाशिक शहरातील डोंगरे वसतिगृह मैदान येथे आज दि. गुरूवार २२ रोजी उद्घाटन झाले. प्रदर्शनात १५ लाखांपासून ४ कोटी पर्यंत गृहप्रकल्प असल्यामुळे उद्घाटनानंतर काही तासातच या प्रदर्शनात एकूण ५४ घरांचे बुकिंग झाले.अशी माहिती समन्वयक जयेश ठक्कर यांनी दिली. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे नाशिक शहरात प्रथमच हे भव्य प्रॉपर्टी एक्झिबिशन ” होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो” प्रदर्शन सुरु झाले आहे.
होमथॉन प्रदर्शनाला स्वामी फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी इरफान काझी भेट देणार…
‘स्वामी फंड ‘ हा केंद्र सरकारचा रियल इस्टेट प्रकल्पात मदत करण्यासाठी उभारण्यात आलेला असून सध्या भारतातील सुमारे ९० प्रकल्पासाठी स्वामी फंडामार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व ग्राहकांना वेळेवर घरे मिळावी, यासाठी यासाठी हा फंड निर्माण करण्यात आला आहे. होमेथॉन प्रदर्शनाला भेट देण्यासाठी स्वामी फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी इरफान काझी दुपारी १२ वाजता उपस्थित राहणार असून यावेळी बांधकाम व्यवसायिकांशी ते संवाद साधणार आहे.