नाशिकच्या नामांकित बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे

नाशिक शहरात महात्मा गांधी रोड,कुलकर्णी गार्डन,गडकरी चौक परिसरात छापेमारी सुरु

1

नाशिक,२० एप्रिल २०२३ – नाशिक शहरात एकाच वेळी १५ हून अधिक नामांकीत बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालये, घरे, फार्म हाऊस आणि साईटवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. या छाप्यात आयकर विभागाचे २०० कर्मचारी सहभागी असल्याचे समजते आहे हे सर्व अधिकारी नाशिक, औरंगाबाद, पुणे, मुंबई येथील असल्याचे सांगितले जाते आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून एकाच वेळी झालेल्या छापीमारीने बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई पुण्यानंतर नाशिकच्या बांधकाम क्षेत्रात मोठा विकास होत आहे. घराच्या किंमती सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर गेल्या असून अनेक सुविधा देण्याच्या नावाखाली नाशिकमधील घराचे दरात मोठी वाढ झाली आहे.नाशिक शहरातील गंगापूर रोड,गोविंदनगर येथील घरांच्या किमती मध्ये मोठ्याप्रमाणात वाढ केली आहे.आतातर नाशिक मध्ये सर्वसामान्य नागरिकांना घर घेणे हे फक्त स्वप्नातच शक्य आहे.अशी सर्वसामान्य नागरिकांची भावना आहे.

मागील काही महिन्यात महाराष्ट्रासह देशभरामध्ये आयकर विभागाच्या मार्फत विविध ठिकाणी छापेमारी करत कर बुडविणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. आयकर विभागाच्या दिल्ली पथकांनी छापे टाकले असून आयकरात तफावत असल्याचा ठपका अनेक बांधकाम व्यावसायिकांवर ठेवण्यात आला आहे.

नाशिकमध्ये १५ हुन अधिक बांधकाम व्यवसायिकांवर गुरुवारी सकाळपासून छापे टाकण्याचे काम सुरु आहेत. या कारवाईने नाशिकमधील बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नाशिक शहरात महात्मा गांधी रोड , कुलकर्णी गार्डन,गडकरी चौक परिसर यांसह शहरातील विविध ठिकाणी असणाऱ्या १५ हुन अधिक बांधकाम व्यवसायिकांच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले आहेत. आयकर विभागाच्या दिल्ली पथकाने ही कारवाई केली असून आयकरात तफावत असल्याचे जाणवल्याने छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे. यातील अनेक बांधकाम व्यावसायिक नाशिक महानगरपालिकेच्या विविध विकासकामांशी संबंधित असल्याने या कारवाईनंतर औद्योगिक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नाशिकच्या महात्मागांधी रोड तसेच, या बांधकाम व्यावसायिकांची निवासस्थाने, कार्यालय, त्यांच्या मॅनेजर सह महत्त्वाच्या व्यक्तींची निवासस्थाने याठिकाणी आयकरचे पथक दाखल झाले आहेत. या छाप्यांमध्ये नामांकीत बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे. त्यामुळे आयकर विभागाच्या हाती मोठे घबाड लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. आयकर विभागाचे अधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील या पथकांनी एकाचवेळी बांधकाम व्यावसायिकांची निवासस्थाने, कार्यालय, फार्म हाऊस आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांवर छापा टाकला आहे.

आयकर विभागाच्या छाप्यांनी नाशिकच्या बांधकाम क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अचानक हे छापे पडले.त्यातच शहरातील अत्यंत नामांकित बांधकाम व्यावसायिक या छाप्यांमध्ये लक्ष करण्यात आले आहेत. हे छापे नक्की कशासाठी टाकण्यात आले, आयकर चोरी की अघोषित संपत्ती की अन्य काही हे अद्याप समजू शकलेले नाही. आज सायंकाळपर्यंत यासंदर्भात अधिकृत माहिती मिळण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, या बांधकाम व्यावसायिकांकडील सर्व कागदपत्रांची छाननी, बँक खात्याचा तपशील अशा सर्वच बाबींची पडताळणी या पथकांनी सुरू केली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. Vasant Thorat says

    This is not ease of doing business but ease of corruption by tax authorities. Businesses are tired of the demands by taxation staff.

कॉपी करू नका.