शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे

0

मुंबई – शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घरी आयकर विभागाकडून धाड टाकण्यात आली आहे.त्यानंतर यशवंत जाधव यांचे निकटवर्तीय आणि माझगाव विभागाचे शिवसेना संघटक विजय लिपारे यांच्या घरीही आयकर खात्याचे अधिकारी पोहोचले आहे. विजय लिपारे यांच्या काळाचौकी येथील घरातही आयकर विभागाचे अधिकारी पोहचले असून त्याठिकाणी ही तपास सुरु आहे.

यशवंत जाधव यांनी युएईला बनावट कंपनी स्थापन केली होती. स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले यशवंत जाधव पालिकेच्या कंत्राटदारांकडून रोख पैसे घ्यायचे.असा त्यांच्यावर आरोप होत आहे. पालिकेच्या प्रत्येक कंत्राटातील ४० टक्के पैसे यशवंत जाधव यांना मिळायचे. हेच पैसे बनावट कंपन्यांच्या माध्यमातून इतरत्र वळवले जायचे. यशवंत जाधव यांच्या या रोख व्यवहारांचा पुरावा आयकर विभागाच्या हाती लागल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला.

यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी कोलकाता येथील शेल कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार केल्याचं आयकर विभागाच्या यापूर्वीच्या तपासात समोर आल्याची माहिती आहे. यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शेल कंपन्यांबरोबरच्या व्यवहारातून पैसे कमवल्याचा आरोप आहे. यामिनी जाधव यांनी प्रधान डीलर्स नावाच्या कंपनीकडून एक कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याचा निवडणूक प्रतिज्ञापत्रात उल्लेख, मात्र तपासात ही शेल कंपनी असल्याचं उघड झालं आहे. यामिनी जाधव यांनी कर्ज घेतल्याचं दाखवलेलं आहे पण हा पैसा कर्जाचा नाही तर त्यांचाच असल्याचं आयकर विभागाचं म्हणण आहे.

शिवसेनेचे अनेक नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर
नवाब मलिकांना अटक केल्यापासून महाराष्ट्रात काल महाविकास आघाडीकडून धरणं आंदोलन करण्यात आलं तर भाजपकडून नवाब मलिकांनी राजीनामा द्यावा म्हणून आंदोलन करण्यात आले आहे नवाब मलिकांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर शिवसेनेचे अनेक नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर असल्याची चर्चा आहे, आमदार प्रताप सरनाईक, परिवनह मंत्री अनिल परब, खासदार भावना गवळी, आनंदराव अडसूळ इत्यादी नेते रडारवर असल्याने यांच्यावरती कधीही छापेमारी होऊ शकते अशी देखील चर्चा होत आहे.काल किरीट सोमय्या यांनी महाविकासआघाडीच्या डर्टी डझन नेत्यांची नावे जाहीर केली होती. त्यावेळी मी काही नावं विसरला होतो. यामध्ये आता यशवंत जाधव, यामिनी जाधव आणि किशोरी पेडणेकर यांचा समावेश झाल्याचे सांगत किरीट सोमय्या यांनी ट्विट करत शिवसेनेला नवा इशारा दिला आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.