नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ : ऍक्टिव्ह रुग्णसंख्या २८०

मागील २४ तासात : ४८ कोरोना मुक्त : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०७ %

0

नाशिक – आज नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत असून आज जिल्ह्यात एकूण ६० नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले.त्यापैकी नाशिक शहरात नव्या रुग्णांची संख्या ४३ झाली तर जिल्ह्यात आज ४८ जण कोरोना मुक्त झाले आहेत.आज ७३८ जणांचे कोरोनाचे अहवाल येणे प्रतीक्षेत आहे.

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आज ९८.०७ % झाली आहे. सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात ४३ तर ग्रामीण भागात १३ मालेगाव मनपा विभागात १ तर बाह्य ३ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९८.४३ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण २८० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १९२ जण उपचार घेत आहेत. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी – नाशिक शहरात ९८.४३ %, नाशिक ग्रामीण मधे ९७.५३ %, मालेगाव मध्ये ९७.३२ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९८.३८ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९८.०७ %इतके आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:-० ,नाशिक महानगरपालिका- ००.मालेगाव महानगरपालिका-००,नाशिक ग्रामीण-००,जिल्हा बाह्य-००,नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ८९०२,नाशिक शहरात एकूण मृत्यू – ४१०५

सध्या उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण – १) जिल्हा रुग्णालय नाशिक – ० ,२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – २०२,३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक ००,४) मालेगाव मनपा रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ८,५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –७०,जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल – ७३८

आजचे एकूण उपचाराखालील रुग्ण -लक्षणे असलेले रुग्ण – ३५ ,लक्षणे नसलेले रुग्ण – २४५,ऑक्सिजन वरील रुग्ण – ००, व्हेंटिलेटर वरील रुग्ण – ००,
नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)

http://AGE SEX TEMPLATE POSITIVE 30 JUN 22

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!