देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ : २४ तासांत २८५८ नवे रुग्ण

0

नवी दिल्ली – देशात कोरोना संसर्गातून रुग्ण बरे होण्याचा दर ९८.७४ टक्क्यावर पोहोचला असला तरी काल कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ बघायला मिळाली आहे. देशात गेल्या २४ तासांतकोरोनाचे  २८५८ नवे रुग्ण आढळले असून ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात माहिती प्रसिद्ध केली आहे.

त्या आधी  देशात २८४१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या १८ हजार ९६ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत ३ हजार ३५५ कोरोना रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १९१ कोटींहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलल्या आकडेवारीनुसार, देशाची राजधानी दिल्लीत सर्वाधित नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत दिल्लीत ८९९ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.ही मागील दोन महिन्यंमधील सर्वात जास्त कोरोनाबाधितांची संख्या आहे.काल महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या २६३ ,हरियाणात ४३९,केरळ ४१९ तर उत्तर प्रदेशात १७५ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!