‘भारत होणार विश्वविजेता’!अंतिम सामन्यावर ऑस्ट्रेलियाकडून दोन मोठे अंदाज व्यक्त !

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक २०२३ च्या फायनलबाबत ऑस्ट्रेलियाकडून दोन अंदाज वर्तवण्यात आले आहेत.

0

अहमदाबाद,दि.१९ नोव्हेंबर २०२३ – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना आज १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या अंतिम सामन्यापूर्वी विश्वविजेत्याच्या नावाबाबत अनेक भाकिते समोर आली आहेत. यावर भारतीय दिग्गजांनी टीम इंडिया चॅम्पियन होईल असे सांगितले आहेच  पण आता ऑस्ट्रेलियातूनही असे दोन भाकीत आले आहेत ज्यात भारत तिसऱ्यांदा विश्वविजेता होणार असल्याचे बोलले जात आहे.

भारताच्या विजयाची भविष्यवाणी कोणी केली ?
हरभजन सिंग, सुरेश रैना, गौतम गंभीर, सौरव गांगुली आणि इरफान पठाण यांसारख्या अनेक माजी भारतीय क्रिकेटपटूंनी टीम इंडिया चॅम्पियन होण्याची भविष्यवाणी केली होती. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अॅरॉन फिंच आणि शेन वॉटसन यांनीही भारत विश्वविजेता होईल, असे भाकित केले आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकल बेवननेही अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाला फेव्हरिट मानले होते. ऑस्ट्रेलियाची फायनल जिंकण्याची शक्यता कमी असल्याचेही त्याने सांगितले.

टीम इंडिया या स्पर्धेत अजिंक्य 
भारतीय क्रिकेट संघ २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंत एकही सामना हरला नाही. संघाने लीग टप्प्यातील सर्व ९ सामने जिंकले, त्यानंतर उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला. ऑस्ट्रेलियन संघ साखळी फेरीत पहिले दोन सामने हरले होते, त्यानंतर त्यांनी सलग आठ सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत दोन्ही संघ फॉर्मात असले तरी ते भारताचे घरचे मैदान आहे आणि घरच्या प्रेक्षकांचे मनोबल तेथेच असेल. यामुळे जेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाचा वरचष्मा असू शकतो.

भारत २० वर्षांचा बदला घेणार!
एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २० वर्षांनंतर होणार आहे.यापूर्वी २००३ मध्ये, दोन्ही संघ भिडले होते जेथे रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा पराभव केला होता. आता २० वर्षांनंतर टीम इंडियाला त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. विश्वचषकाप्रमाणेच समीकरणे बनत आहेत, फरक इतकाच की त्या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया शेवटपर्यंत अजिंक्य राहिला. या विश्वचषकात टीम इंडिया अजूनही अजिंक्य आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.