जिंकलो रे :आवाज टीम इंडियाचाच :लाखो लोकांसमोर पाकिस्तानने गुडघे टेकले

भारतासमोर पाकिस्तानचा संघ कोसळला :टीम इंडिया अव्वल स्थानावर 

0

अहमदाबाद दि,१४ ऑक्टोबर २०२३ -(IND vs PAK ODI World Cup 2023)जबरदस्त गोलंदाजी, कर्णधार रोहीत शर्माचे अर्धशतक याच्या जोरावर टीम इंडियाने आज त्यांचा पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडियाचा पाकिस्तानकडून वर्ल्डकपमध्ये आठव्यांदा पराभव करण्यात आला आहे. टीम इंडियाने हा सामना ७ विकेटने जिंकला. या विजयासह टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. भारताच्या विजयात गोलंदाज आणि रोहित शर्माने महत्त्वाची भूमिका बजावली. विश्वचषक स्पर्धेत भारताने सलग ८ व्यांदा पाकिस्तानचा पराभव केला आहे. त्याचवेळी भारताविरुद्धच्या विश्वचषकातील पहिल्या विजयाचे पाकिस्तानचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. आता भारत ८-० ने आघाडीवर आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ ४२.५ षटकांत सर्वबाद १९१ धावांवर आटोपला. या काळात शार्दुल ठाकूरशिवाय भारताच्या सर्व गोलंदाजांनी या सामन्यात विकेट घेतल्या. मात्र, शार्दुलने केवळ दोनच षटके टाकली. इतर गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर प्रत्येकाने प्रत्येकी दोन बळी घेतले.यामध्ये मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्या नावाचा समावेश आहे. पाकिस्तानकडून बाबर आझमने सर्वाधिक ५० धावांची खेळी खेळली. तर मोहम्मद रिझवानने ४९ धावा केल्या.

टीम इंडियाचा एकतर्फी विजय 
टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध विजयासाठी ५० षटकांत फक्त १९२ धावांची गरज होती. भारताने या लक्ष्याचा सहज पाठलाग केला आणि अवघ्या ३०.३ षटकात ३ गडी गमावून १९२ धावा केल्या. यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर शुभमन गिलने भारताला दमदार सुरुवात करून दिली. गिल ११ चेंडूत १६ धावा करून बाद झाला असला, तरी रोहित शर्माने पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय विश्वचषकात केवळ ६३ चेंडूत ८६ धावा करत ऐतिहासिक खेळी खेळली.रोहित शर्मा शिवाय श्रेयस अय्यरनेही अर्धशतक झळकावले. अय्यरने ६२ चेंडूत ५३ धावांची खेळी खेळली. भारतीय संघाला पुढचा सामना बांगलादेशविरुद्ध १९ ऑक्टोबरला खेळाला जाणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.