पाकिस्तानकडून पुन्हा जोरदार हल्ला :जम्मू सीमांवर तणाव;सायरन वाजले,बाजार बंद,वीज पुरवठा खंडित

2

जम्मू, ९ मे २०२५ – India Pakistan War Tension: भारत-पाकिस्तान सीमांवर पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी सकाळपासून पाकिस्तानकडून जम्मू आणि काश्मीरमधील उरी, कुपवाडा आणि लंगधार भागात जोरदार गोळीबार व तोफांद्वारे हल्ला करण्यात आला आहे. यानंतर जम्मू शहरात सायरन वाजू लागले, बाजारपेठा बंद करण्यात आल्या आणि कई भागांत ब्लॅकआऊट (Blackout in Jammu) करण्यात आला आहे.

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन
पाकिस्तानने सीमेवरील शांतता भंग करत सीजफायरचे उल्लंघन केलं आहे. तोफांचा मारा करत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे. भारताच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, सेनेने पाकिस्तानच्या या प्रयत्नांना परतवून लावले आहे, मात्र सतर्कता कायम ठेवली जात आहे.

सतर्कतेचे आदेश; नागरिकांनी बंकरमध्ये आसरा घ्यावा(India Pakistan War Tension)
सीमा भागात राहणाऱ्या नागरिकांना बंकरमध्ये आसरा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पेंद्रीय गृहमंत्रालयाने जनतेला शांत राहण्याचं, अफवा न पसरवण्याचं आवाहन केलं आहे. जम्मू काश्मीर पोलिस महासंचालकांनी देखील लोकांना सतर्क राहण्यास आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.

संपूर्ण परिसरात हाय अ‍ॅलर्ट
सीमेवरील गोळीबारामुळे संपूर्ण परिसरात हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.पुढील सूचना मिळेपर्यंत शाळा आणि सार्वजनिक मेळावे स्थगित करण्यात आले आहेत. सध्या सुरक्षा यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असून, नागरिकांना घरातच राहण्यास सांगण्यात आलं आहे.

India Pakistan Border Tension, Jammu Blackout Today, Pakistan Ceasefire Violation May 2025, Uri Kupwara Shelling, Jammu Sirens News, India Pakistan Latest War News, Jammu Market Closed Today, LOC Firing Updates

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!