अणुबॉम्ब डागण्यास भारत २६ राफेल सागरी विमाने खरेदी करणार
भारत-फ्रान्समध्ये आज राफेल करार ; आयएनएस विक्रांतवर राफेल विमान तैनात होणार
नवी दिल्ली,दि २८ एप्रिल २०२५ – अणुबॉम्ब डागण्यास भारत आज फ्रान्ससोबत २६ राफेल मरीनसाठी करार करणार आहे. या करारानुसार, भारत फ्रान्सकडून २२ सिंगल सीटर विमाने आणि ४ डबल सीटर विमाने खरेदी करेल. दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये हा करार होईल.ही विमाने अणुबॉम्ब डागण्याची क्षमता असलेली असतील.फ्रान्ससोबतचा हा करार सुमारे ६३ हजार कोटी रुपयांना होत आहे.राफेल मरीन विमानाची वैशिष्ट्ये हवाई दलाच्या राफेल विमानांपेक्षा अधिक प्रगत आहेत.भारत आयएनएस विक्रांतवर राफेल सागरी विमान तैनात करणार आहे.
शस्त्रास्त्र खरेदीच्या बाबतीत भारताचा फ्रान्ससोबतचा भारताचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली २३ एप्रिल रोजी झालेल्या सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीच्या (सीसीएस) बैठकीत या विमानाच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर ही बैठक बोलावण्यात आली होती.
विमान उत्पादक कंपनी डसॉल्ट एव्हिएशनने भारताच्या गरजेनुसार या विमानांमध्ये अनेक बदल केले आहेत.यामध्ये जहाजविरोधी हल्ला,अण्वस्त्रे डागण्याची क्षमता आणि १० तासांपर्यंत उड्डाण रेकॉर्डिंग यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. याशिवाय, कंपनी भारताला शस्त्र प्रणाली, सुटे भाग आणि विमानांसाठी आवश्यक साधने देखील पुरवेल.
Today, India and France signed a mega Rs 63,000 crore deal to buy 26 Rafale Marine aircraft for the Indian Navy. The Indian side was represented by Defence Secretary Rajesh Kumar Singh, where Navy Vice Chief Vice Admiral K Swaminathan was present
(Video source: Indian Navy… pic.twitter.com/5W6SdwcuD8
— ANI (@ANI) April 28, 2025