मोठी बातमी : पाकिस्तानवर भारताची एअर स्ट्राईक; नऊ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला
ऑपरेशन सिंदूर’ द्वारे दहशदवाद्यांच्या ठिकाणावर भारताची एअर स्ट्राईक
जम्मू-काश्मीर | ७ मे २०२५ – (Indian Army strikes PoK)भारताने अखेर जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर (PoK) आणि पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केली आहे. या कारवाईत मिसाईल हल्ल्यांद्वारे दहशतवादी तळांचे पूर्णपणे उध्वस्त करण्यात आले आहे.यामध्ये फक्त दहशदवाद्यांच्या ठिकाणावर हल्ला केला असून पाकिस्तान मिलिटरीच्या कोणत्याही ठिकाणी क्षती पोहचली नाही
Union Minister Kiren Rijiju tweets, “#OperationSindoor“
(Video Source: Kiren Rijiju/X) pic.twitter.com/kdBY2xeHqN
— ANI (@ANI) May 6, 2025
भारतीय लष्कराची नियंत्रित आणि नेमकी कारवाई (Indian Army strikes PoK)
संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, ही कारवाई अतिशय नियोजित, संयमी आणि उद्दिष्टपूर्तीवर लक्ष केंद्रित करणारी होती. या स्ट्राईकमध्ये कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आलेले नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे. मंत्रालयाने सांगितले की, ही प्रतिक्रिया पहलगाममधील निर्घृण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर होती, ज्यामध्ये २७ भारतीय नागरिक आणि एक नेपाळी नागरिक मृत्युमुखी पडले होते.
Union Minister Kiren Rijiju tweets, “#OperationSindoor“
(Video Source: Kiren Rijiju/X) pic.twitter.com/kdBY2xeHqN
— ANI (@ANI) May 6, 2025
पाकिस्तानची नेहमीची ढोंगी प्रतिक्रिया
भारतीय एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने नेहमीप्रमाणे आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मगरमच्छाचे अश्रू ढाळायला सुरुवात केली आहे. डॉन न्यूजच्या अहवालानुसार, ISPR चे डायरेक्टर जनरल लेफ्टिनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी भारताच्या कारवाईचा निषेध करत कोटली, बहावलपूर आणि मुजफ्फराबाद येथे हल्ला झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी या कारवाईला “कायरतापूर्ण हल्ला” असे संबोधले आहे.
Defence Minister Rajnath Singh tweets “भारत माता की जय!”#OperationSindoor pic.twitter.com/MLAEJ6AiBq
— ANI (@ANI) May 6, 2025
आगामी माहितीची प्रतीक्षा
संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की,‘ऑपरेशन सिंदूर’विषयी सविस्तर माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाईल. ही कारवाई भारताच्या दहशतवादविरोधी धोरणाची ठोस झलक आहे आणि देशविरोधी कृत्यांना पाठीशी घालणाऱ्यांना ठोस इशारा देखील आहे.
[…] […]
[…] […]
[…] पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताच्या मिसाईल हल्ल्याची कबुली दिल… […]