📰 नवी दिल्ली | ७ मे २०२५- Indian fighter jets night exercise पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलण्याची मागणी होत असताना, भारतीय वायुदल (Indian Air Force) पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या राजस्थानमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर बुधवार ते गुरुवार रात्री मोठा युद्धाभ्यास करणार आहे.
हा युद्धाभ्यास जम्मू-काश्मीरच्या ऐवजी राजस्थान सीमेवर होत असल्यामुळे भारताच्या सामरिक तयारीचा आणि सशक्त प्रतिसादाचा संदेश पाकिस्तानला दिला जाणार आहे.
✈️ राफेल, सुखोईसह आधुनिक लढाऊ विमानांचा सहभाग
या युद्धाभ्यासात राफेल (Rafale), सुखोई (Sukhoi), मिग (MiG), जगुआर (Jaguar) यांसारखी आधुनिक लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत.
वायुदलाने यासाठी NOTAM – Notice to Airmen जारी करत रात्रीच्या काळात या भागातील हवाई क्षेत्र नो फ्लायिंग झोन घोषित केले आहे.
⏰ सहा तासांचा युद्धाभ्यास – रात्री ९ ते पहाटे ३
वायुदलाचा हा युद्धाभ्यास बुधवारी रात्री ९ वाजता सुरू होईल आणि गुरुवारी पहाटे ३ वाजेपर्यंत चालेल. या दरम्यान सीमेलगतच्या भागातील हवाई उड्डाणांवर बंदी राहील.
🛡️ पाकिस्तानला ठाम संदेश (Indian fighter jets night exercise)
हे युद्धाभ्यास पाहलगाम हल्ल्यानंतर भारताची युद्धपातळीवरील सज्जता दर्शवणारा आहे. भारत सरकारने सिंधू जल करारावर पुनर्विचार सुरू केला असून, सर्व तिन्ही सैन्यदल युद्धजन्य परिस्थितीसाठी सज्ज होत आहेत.
🪖 थलसेना आणि नौदलही तयारीत
सेना प्रमुख जनरल उपेन्द्र द्विवेदी यांनी श्रीनगर भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला आहे. नौदलानेही हिंद महासागरात युद्धाभ्यास केला आहे.
📞 पंतप्रधान मोदी यांची तिन्ही सैन्यप्रमुखांशी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तिन्ही दलप्रमुखांशी स्वतंत्रपणे चर्चा केली आहे. गृह मंत्रालयानेही सर्व राज्यांना नागरिक सुरक्षा प्रशिक्षण घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
[…] […]
[…] […]
[…] पार्श्वभूमीवर आज रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला संबोधित करणार आहेत. […]