महाराष्ट्रात होणार भारतातील सर्वात लांब सागरी महामार्ग
मुंबई ते अलिबाग दरम्यान प्रवास अवघ्या २० मिनिटात : "या" दिवशी होणार सर्वसामान्यांसाठी खुला
मुंबई – महाराष्ट्रात आता अजून एक महामार्ग लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला होणार असल्याचे चित्र आहे. सध्या रस्ते विकासाची कामे जोरात सुरू आहेत. वेगवेगळ्या महामार्गाची कामे प्रगतीपथावर असून काही महामार्गांसाठी भूसंपादन केले जात आहेत. तर काही महामार्ग लोकार्पणासाठी सज्ज झाली आहेत. महाराष्ट्रासाठी अति महत्त्वाचा असा मुंबई- नागपूर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. नागपूर ते शिर्डी पर्यंतचा हा मार्ग ११ डिसेंबर २०२२ रोजी सामान्यांसाठी खुला झाला आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक.दरम्यान आता या महामार्गाच्या लोकार्पणाविषयी एक मोठी माहिती समोर येत आहे.खरं पाहता हा सागरी महामार्ग असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष याकडे लागून आहे.या मार्गाचे आत्तापर्यंत ९०% काम पूर्ण झाले असून नोव्हेंबरमध्ये हा महामार्ग खुला होणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या मुंबई हार्बर लिंक म्हणजे एमटीएचएल प्रकल्पाच्या पॅकेज २ मधील पहिला सर्वात जास्त लांबीचा म्हणजेच सुमारे १८० मीटर लांबीचा आणि सुमारे २ हजार ३०० मेट्रिक टन वजनाच्या ऑर्थोोट्रॉपिक स्टिल डेकची उभारणी करण्यात आली आहे.
याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री महोदय यांनी हा देशातील सर्वात लांबीचा सागरी मार्ग असल्याचे सांगितले तसेच हा मार्ग ओपन रोड टोलींग यंत्रणा असलेलाही देशातील पहिलाच मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे या मार्गावर प्रवास करताना टोल भरण्यासाठी वाहनचालकांना थांबण्याची अजिबात गरज भासणार नाहीये. या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते अलिबाग दरम्यान अवघ्या वीस मिनिटात प्रवास करता येणे शक्य होणार आहे.
असा असणार मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रोजेक्ट मुंबई शहरातील शिवडी आणि मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणारा सुमारे २२ किमी लांबीच्या ६ पदरी (३+३ मार्गिका) पूल आहे. या प्रोजेक्टची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याअंतर्गत तयार होणाऱ्या पुलाच्या एकूण लांबी पैकी समुद्रातील लांबी सुमारे १६.५ किमी आहे तर जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे ५.५ किमी इतकी आहे.
हेच कारण आहे की याला सागरी महामार्ग म्हटलं जात आहे. या मार्गाचे काम एम एम आर डी ए म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जात आहे. या संपूर्ण प्रकल्पांतर्गत एकूण ७० ऑर्थोट्रॉपिक स्टिल डेक स्पॅन समुद्रात उभारले जाणार आहेत.यापैकी एकूण ३६ स्पॅनची उभारणी देखील पूर्ण झाली आहे. दरम्यान आता या प्रोजेक्टचे ९० % काम पूर्ण झाले असून नोव्हेंबर मध्ये हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे.