इंडोनेशियात ज्वालामुखीचा भीषण उद्रेक!११ किमी.पर्यंत राखेचे ढग,‘मॅक्सिमम अलर्ट’ जाहीर
संध्याकाळी ५:३५ वाजता उद्रेक;हवाई वाहतुकीवर परिणाम
📍 जकार्ता, दि. १८ जून २०२५ – Indonesia Volcano Alert इंडोनेशियातील ईस्ट नुसा तेंगारा प्रांतातील माउंट लेवोटोबी लाकी-लाकी या ज्वालामुखीत मंगळवारी संध्याकाळी भीषण उद्रेक झाला. यामध्ये सुमारे ११ किलोमीटर उंच राखेचा गुबार आकाशात पसरला असून, देशाच्या ज्वालामुखी विज्ञान संस्थेने ‘मॅक्सिमम अलर्ट’ अर्थात सर्वोच्च इशारा पातळी जाहीर केली आहे.
🌋 ज्वालामुखीची वैशिष्ट्ये:(Indonesia Volcano Alert)
माउंट लेवोटोबी लाकी-लाकी हा १,५८४ मीटर उंच असून फ्लोरेस बेटावर स्थित आहे.(Mount Lewotobi Volcano Eruption Indonesia)
हा जुळा ज्वालामुखी असून याच्या जोडीला लेवोटोबी पेरेम्पुआन नावाचा दुसरा, थोडा उंच पण तुलनेत शांत ज्वालामुखी आहे.
Bali flights cancelled after Indonesia volcano eruption.
Mount Lewotobi Laki-Laki, a 1,703-metre (5,587-foot) twin-peaked volcano on the tourist island of Flores, erupted on Tuesday, with authorities raising its alert status to the highest level.https://t.co/RQQ2rlwPYX pic.twitter.com/Y9Hg81xWrb
— AFP News Agency (@AFP) June 18, 2025
🕔 संध्याकाळी ५:३५ वाजता उद्रेक:
स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी साडेपाच वाजता मोठा स्फोट झाला. त्यावेळी संतरी रंगाच्या मशरूमसारखा राखेचा जाड धुराचा गुबार गावांच्या वर पसरला. या राखेचे ढग ९० ते १५० किलोमीटर दूरवरूनही स्पष्टपणे दिसत होते.
✈️ हवाई वाहतुकीवर परिणाम:
यामुळे विमान वाहतूक सेवा मोठ्या प्रमाणात बाधित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याआधी मार्च महिन्यात झालेल्या अशाच स्फोटामुळे ऑस्ट्रेलियाच्या जेटस्टार आणि क्वांटास यांसारख्या विमानसेवा बंद कराव्या लागल्या होत्या.
इंडोनेशियातील माउंट लेवोटोबी लकी-लकी या ज्वालामुखीच्या भीषण उद्रेकामुळे बाली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणे रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे. याचा थेट परिणाम भारतासह अनेक देशांच्या विमान वाहतुकीवर झाला असून, दिल्लीहून बालीकडे जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट एआय 2145 ला मध्य मार्गातून परतविण्याचा निर्णय घेण्यात आला.
✈️ प्रवाशांच्या सुरक्षिततेस प्राधान्य :
एअर इंडियाने यासंदर्भात दिलेल्या अधिकृत निवेदनात सांगितले की, “ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या राखेच्या धुक्यामुळे हवेत दृष्यमानता आणि इंजिन सुरक्षेचा धोका निर्माण झाला होता. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून विमानाला परत बोलावण्यात आले. विमान सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरले असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत.”
🏨 प्रवाशांसाठी सुविधा :
एअर इंडियाने पुढे म्हटले की, “विमानाच्या परतीमुळे प्रवाशांच्या सोयीचा विचार करत, हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, अन्न आणि आवश्यक गरजा पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसेच, ज्या प्रवाशांना तिकिटे रद्द करायची असतील, त्यांना पूर्ण परतावा दिला जाईल किंवा मोफत रीशेड्युलिंगची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल.”
🌋 ज्वालामुखी उद्रेकामुळे वाहतूक विस्कळीत :
माउंट लेवोटोबी लकी-लकीचा भीषण उद्रेक मंगळवारी संध्याकाळी झाला. स्फोटामुळे ११ किमी. उंच राखेचा गुबार आकाशात पसरला असून, बाली विमानतळावरून १० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यात भारत, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि चीन या देशांच्या फ्लाइट्सचा समावेश आहे.
😨 स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण :
या स्फोटामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रशासनाने ज्वालामुखीजवळील ८ किमीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे
🚨 सतर्कता आणि आपत्ती व्यवस्थापन:
८ किमीपर्यंतचा परिसर ‘धोका झोन’ म्हणून घोषित
प्रशासनाने नागरिकांना नद्यांमध्ये संभाव्य लावाच्या प्रवाहाबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी नोंदलेली नाही.
📊 उद्रेकाची तीव्रता:
इंडोनेशियन जिओलॉजिकल एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १०,००० मीटर उंचीचे राखेचे ढग दिसले. दोन तासांत ५० पेक्षा जास्त ज्वालामुखी हालचाली नोंदवल्या गेल्या. हे देशातील सर्वाधिक सक्रिय ज्वालामुख्यांपैकी एक आहे.
🌏 इंडोनेशियाचा भूगोल:
सुमारे २७ कोटी लोकसंख्या असलेल्या या द्वीपसमूहात १२० सक्रिय ज्वालामुखी आहेत. या भागात सतत भूकंपीय हालचाली जाणवतात.
उद्रेक अजूनही सुरू असताना प्रशासन सतर्क आहे. येणाऱ्या दिवसांत हवामान आणि राखेच्या हालचालींवर लक्ष ठेवून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे