इंद्रायणी मालिकेत नवा ट्विस्ट ! गोपाळ देणार प्रेमाची कबुली

0

📍 मुंबई | ६ मे २०२५- Indrayani Marathi serial कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘इंद्रायणी’ आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेतील मुख्य पात्र इंदू गावात शाळा सुरू करण्याचं मोठं स्वप्न उराशी बाळगते आणि मोहितरावांना खुले आव्हान देते – “पुढच्या एका वर्षात मी विठूच्या वाडीत शाळा सुरू करून दाखवेन!”

इंदूच्या या वचनामुळे संपूर्ण गावात एक नवचैतन्य निर्माण झालं आहे. गावकरी, अधू, फँटया गँग आणि गोपाळ तिच्या पाठीशी ठाम उभे आहेत. परंतु, सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आणणारा आणि हृदय जिंकणारा क्षण तब्बल यावेळी येतो, जेव्हा गोपाळ इंदूवर असलेल्या प्रेमाची उघडपणे कबुली देतो.

🧡 गोपाळ म्हणतो: “माझं तिच्यावर प्रेम आहे!”
मालिकेच्या पुढील भागात मोहितराव इंदूवर हात उगारण्याचा प्रयत्न करतो, पण त्या वेळी गोपाळ ती वेळेत वाचवतो. गोपाळ रागात ओरडतो, “माझ्या इंद्रायणीवर हात टाकणाऱ्याचा मी जीव घेईन… कारण माझं तिच्यावर प्रेम आहे!”

या कबुलीनंतर मालिकेच्या कथानकाला एक रोमँटिक आणि भावनिक वळण मिळणार आहे. पण दुसरीकडे अधूलाही इंदू आवडते, हे देखील मालिकेत आधीच दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे पुढील त्रिकोणी प्रेमकथा कशी उलगडणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

⚔️ मोहितरावचा सूड – इंदूच्या मार्गात अडथळ्यांचा डोंगर
व्यंकू महाराज आणि इंदूने कीर्तनातून मोहितरावाचा खरा चेहरा उघड करताच, तो चिडतो आणि इंदूवर सूड उगवण्याचा कट आखतो. आता त्याला रोखणं इंदू आणि तिच्या साथीदारांसाठी सोपं नाही. मात्र, इंदू आपल्या ध्येयाप्रती ठाम आहे – गावात शाळा सुरू करणं!

📺 मालिकेची वेळ:
‘इंद्रायणी’(Indrayani Marathi serial) सोमवारी ते शनिवारी, संध्याकाळी ७ वाजता, फक्त कलर्स मराठीवर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!