इन्फिनिक्सचे ५ जी स्‍मार्टफोन लाँच 

0

मुंबई – भारत ५जी तंत्रज्ञान व नेटवर्क लाँच करण्याच्या समीप पोहोचत असताना इन्फिनिक्स या ट्रांसियॉन ग्रुपच्या प्रिमिअम स्मार्टफोन ब्रॅण्डने आज भारतीय बाजारपेठेमध्ये त्यांचा पहिला ५जी स्मार्टफोन झीरो ५जी लाँच केला आहे. इन्फिनिक्सने झीरो ५जी च्या चाचणीसाठी रिलायन्स जिओसोबत सहयोग केला आहे आणि उत्तम कार्यक्षमता निष्पत्ती संपादित केल्या आहेत. अत्यंत नवीन झीरो ५जी सुलभ कार्यक्षमता असलेला फ्यूचर-रेडी ५जी फोन खरेदी करू पाहणा-या युजर्ससाठी परिपूर्ण पॅकेज असेल. या स्मार्टफोनमध्ये १३ ५जी बॅण्ड्स आहेत, जे आतापर्यंतच्या कोणत्‍याही स्मार्टफोनमधील बॅण्ड्सच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. उच्चस्तरीय वैशिष्ट्ये असलेल्या या स्मार्टफोनची किंमत १९,९९९ रूपये आहे.

हा स्मार्टफोन १८ फेब्रुवारीपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. युजर्स १०० रूपयांच्या अतिरिक्त शुल्कामध्ये डिवाईसवर ई-कॉमर्स व्यासपीठाच्या नुकतेच लाँच केलेल्या फ्लिपकार्ट स्मार्ट अपग्रेड प्रोग्रामचा देखील लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत ते एमओपी मूल्याच्या फक्त ७० टक्‍के रक्‍कम भरत झीरो ५जी खरेदी करू शकतात. डिवाईस एक वर्ष वापरल्यानंतर ग्राहक उर्वरित ३० टक्‍के रक्‍कम भरून स्मार्टफोन कायम ठेवू शकतात किंवा फ्लिपकार्टला परत करू शकतात. याव्‍यतिरिक्त ग्राहक सहा, नऊ व बारा महिन्यांसाठी नो कॉस्‍ट ईएमआय पर्यायाचा देखील लाभ घेऊ शकतात.

Infinix launches 5G smartphone

उच्चस्तरीय वैशिष्ट्यांनी युक्त प्रिमिअम व ट्रेण्डी डिझाइन डिवाईस आधुनिक प्रोसेसर, विस्तारित करता येऊ शकणारी ८ जीबी + ५ जीबी रॅम, १२८ जीबी रॉम, विशाल क्षमतेच्या बॅटरीसह सुपरफास्ट चार्जिंग आणि प्रगत कॅमेरा अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये असलेला विभागातील पहिला डिवाईस असेल. ज्यामुळे ग्राहकांना सर्वोत्तम स्मार्टफोन अनुभव मिळेल. हा डिवाईस दोन आकर्षक रंगांच्या व्हेरिएण्ट्समध्ये येईल – स्कायलाइट ऑरेंजसह वेजन लेदर बॅक पॅनेल व कॉस्मिक ब्लॅक.

उच्च दर्जाची कार्यक्षमता: नवीन झीरो ५जी मध्ये उच्चस्तरीय फर्स्ट-इन-सेगमेंट मीडियाटेक डायमेन्सिटी ९०० प्रोसेसर आहे. यामध्ये अधिक मल्टी-टास्कर ग्राहकांना कार्यक्षम शक्ती व बॅटरी क्षमतेच्या खात्रीसाठी ६-नॅनोमीटर प्रोसेसर आहे. झीरो ५जी आधुनिक एलपीडीडीआर५ रॅम तंत्रज्ञान व अल्ट्रा-फास्ट (यूएफएस) ३.१ स्टोरेज असलेला इन्फिनिक्सचा पहिला स्मार्टफोन देखील आहे. यामुळे विविध अॅप्सदरम्यान मोठ्या फाइल्स स्टोअर व ट्रान्सफर करता येतात आणि अत्यंत जलद गतींमध्ये विनाव्यत्यय गेमिंगचा आनंद घेता येतो.

आधुनिक अँड्रॉईड ११ वर संचालित झीरो ५ जी मेमफ्यूजनच्या माध्‍यमातून १३ जीबी पर्यंत वाढवता येणा-या रॅमद्वारे युजर्सना विनाव्यत्यय कन्टेन्ट पाहण्याचा आनंद देतो. ८ जीबी/१२८ जीबी व्हेरिएण्ट इंटर्नल स्टोरेजमध्ये ५ जीबी बाह्य मेमरीची भर करतो आणि विद्यमान रॅम क्षमतेमध्ये वाढ करत कोणत्‍याही अडथळ्याशिवाय विविध अॅप्सदरम्यान एकसंधी शिफ्टची खात्री देतो.

अल्ट्रा-स्मूद डिस्प्ले व डिझाइन: इन्फिनिक्सचा नवीन डिवाईस फर्स्ट-इन-सेगमेंट युनि-कर्व्ह स्टाइल पॅनेलमध्ये डिझाइन करण्यात आला आहे. कॅमेरा मॉड्यूलचा आकर्षक ग्रेडिएण्ट आर्क कॅमेरा सिंगल-शीट रिअर पॅनेलला एकसमान फ्लूईड कर्व्हसह संतुलित करतो, ज्यामधून युजर्सच्या स्वत:च्या स्टाइलला पूरक असे फोनचे स्लीक कॉन्चर्स मिळतात. झीरो ५जी मध्ये ६.७८ इंच एफएचडी+ एलटीपीएस आयपीएस डिस्प्लेसह व्यापक १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट व २४० हर्टझ टच सॅम्प्लिंग रेट आहे, जे युजर्सच्या बोटांना अत्यंत सुलभपणे इंटरअॅक्शन करण्याची खात्री देते.

कॅमेरा अनुभव: झीरो ५जी किफायतशीर दरामध्ये दर्जात्मक कॅमेरा देण्यासंदर्भातील इन्फिनिक्सच्या वारसाला पुढे घेऊन जातो. या डिवाईसमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह ४८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा लेन्स, १३ मेगापिक्सल पोर्ट्रेट लेन्स, २ मेगापिक्सल डेप्थ लेन्स व क्वॉड-एलईडी फ्लॅशलाइट्स आहे. कॅमेरा विभागातील १३ मेगापिक्सल पोर्ट्रेट लेन्समध्ये २एक्स ऑप्टिकल झूम व ३०एक्स डिजिटल झूम आहे, जे कोणत्याही स्थितीमध्ये दूरच्या वस्तूंना सुस्पष्टपणे कॅप्चर करू शकते.

विशाल क्षमतेची बॅटरी: झीरो ५जी मध्ये ५००० एमएएच उच्च क्षमतेची बॅटरी आहे, जी दीर्घकाळापर्यंत अधिक वापरानंतर देखील स्मार्टफोन कार्यरत ठेवते. यामुळे युजर्स दीर्घकाळापर्यंत चित्रपट पाहू शकतात, गेम्स खेळू शकतात, संगीत ऐकण्याचा आणि आवडते मनोरंजन पाहण्याचा आनंद घेऊ शकतात.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.