इन्फिनिक्सचे नवीन ३२ व ४३ इंच अँड्रॉईड एक्स३ टीव्ही लाँच
उच्च दर्जाची पिक्चर क्वॉलिटी आणि उच्च दर्जाच्या स्टिरिओ साऊंडसह काय आहेत वैशिष्ठ जाणून घेऊया !
मुंबई – एक्स१ सिरीजला मिळालेल्या भव्य यशानंतर इन्फिनिक्स हा ट्रांसियॉन ग्रुपचा प्रिमिअम स्मार्टफोन ब्रॅण्ड अल्ट्रा-स्लिम डिझाइनमधील त्यांची नवीन अँड्रॉईड एक्स३ स्मार्ट टीव्ही सिरीज लाँच करण्यात आले आहे. अॅण्टी-ब्ल्यू रे तंत्रज्ञानाचे पाठबळ असलेली ही सिरीज सुरक्षित व्युईंग अनुभवासह सिनेमॅटिक अनुभवासाठी उच्च दर्जाची पिक्चर क्वॉलिटी आणि उच्च दर्जाच्या स्टिरिओ साऊंडची खात्री देते. ३२-इंच व ४३-इंच व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असलेले हे स्मार्ट टीव्ही अनुक्रमे ११,९९९ रूपये आणि १९,९९९ रूपये या किंमतींमध्ये १६ मार्चपर्यंत प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहेत. युजर्ससाठी स्पेशल प्री-बुक ऑफर खरेदीच्या दहा दिवसांपासून उपलब्ध आहे, जेथे ते १४९९ रूपये किंमत असलेले इन्फिनिक्स स्नॉकोर (आयरॉकर) १ रूपयामध्ये खरेदी करू शकतील.
नवीन व सुधारित एपिक इंजिन ३.० इमेज प्रोसेसर अल्गोरिदम्सचा वापर करत एकूण पिक्चर क्वॉलिटी वाढवते आणि शार्पनेस, कलर, कॉन्ट्रास्ट व क्लेरिटी वाढवत वैविध्यपूर्ण पिक्चर क्वॉलिटीचा अनुभव देते. या टीव्हीमध्ये १२२ टक्के सुपरआरजीबी कलर गम्यूट आहे, जे नैसर्गिक रंगसंगतीची व्यापक श्रेणी आणि गडद चित्रांदरम्यान सखोल कॉन्ट्रास्ट देते. एचडीआर १० सह एचएलजी सपोर्टचे संयोजन आणि जवळपास ४०० नीट्स ब्राइटनेस डिमिंगमध्ये मदत करतात आणि ब्राइटनेस लेव्हल्स समायोजित करत सुस्पष्ट व प्रखर पिक्चर्सची खात्री देते.
अल्ट्रा-स्लिम डिझाइन: इन्फिनिक्स एक्स३ सिरीजमधील आकर्षक नवीन स्मार्ट टीव्ही सडपातळ व वजनाने हलके आहेत, जे लिव्हिंग रूम, तसेच कार्यालयामध्ये परिपूर्णपणे मावून संपूर्ण सजावटींमध्ये अत्याधुनिक व लक्झरीअस आकर्षकतेची भर करू शकतात. एचडी स्क्रीन व ९३ टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशिओ असलेला ३२-इंच स्मार्ट टीव्हीमध्ये ३५ मिमी ऑप्टिकलल डिस्टन्स आहे, तर ४३-इंच व्हेरिएण्टमध्ये एफएचडी स्क्रीन व ९६ टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशिओ आहे आणि सर्वोत्तम व विनाव्यत्यय व्युइंगसाठी २० मिमी ऑप्टिकल डिस्टन्स आहे.
सुरक्षित व्युइंग अनुभव: इन्फिनिक्स एक्स३ स्मार्ट टीव्हींमध्ये अॅण्टी–ब्ल्यू रे तंत्रज्ञान आहे, जे टीव्हींमधून बाहेर पडणारे घातक ब्ल्यू किरणे कमी करतात, ज्यामुळे दीर्घकाळापर्यंत टीव्ही पाहत राहिल्याने डोळ्यांना होणा-या नुकसानाला प्रतिबंध होतो.
सर्वोत्तम साऊंड: इन्फिनिक्स एक्स३ सिरीजमध्ये संपन्न, सुस्पष्ट, हाय-क्वॉलिटी सिनेमॅटिक साऊंड अनुभव देण्यासाठी शक्तिशाली डॉल्बी स्टिरिओ साऊंड सिस्टिम आहे. ३२-इंच टीव्ही २० वॅट आऊटपुट (२ बॉक्स स्पीकर्स) देतो, तर ४३-इंच टीव्ही २ बॉक्स स्पीकर्स व २ ट्विटर्ससह (८ हजार ते २० हजार हर्टझ रेंजपर्यंत क्वॉलिटी साऊंडमध्ये वाढ करणारे) ३६ वॅट आऊटपुट देतो.
शक्तिशाली कार्यक्षमता: आधुनिक अँड्रॉईड ११ वर कार्यान्वित इन्फिनिक्स एक्स३ स्मार्ट टीव्हींमध्ये आधुनिक रिअलटेक आरटीडी२८४१ ६४-बीट ए५५*४ शक्तिशाली प्रोसेसरसह १ जीबी रॅम आणि उच्च कार्यक्षमतेसाठी ८ जीबी रॉम आहे. यामधून खात्री मिळते की, प्रेक्षक कमी ऊर्जा वापरासह उच्च कार्यक्षमतेचा आनंद घेऊ शकतात.
प्रमाणित अँड्रॉइड: आधुनिक अँड्रॉइड ११ ची शक्ती असलेल्या इन्फिनिक्स एक्स३ अँड्रॉइड स्मार्ट टीव्हींमध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, यूट्यूब सारखी आवडती व्हिडिओ अॅप्स आणि अॅप स्टोअरमधील शेकडो अॅप्ससाठी एकसंधी कनेक्टीव्हीटीकरिता बिल्ट-इन क्रोमकास्ट आहे. तुम्ही टीव्हीला डान्सफ्लोअर, रेसट्रॅकमध्ये बदलू शकता आणि मोठ्या स्क्रीनवर कोणत्याही मनोरंजनाचा आनंद घेताना कंट्रोलर्स म्हणून स्मार्टफोन्सचा वापर करू शकता. तसेच वन-टच किंवा वॉईस-सक्षम गुगल असिस्टण्ट वैयक्तिकृत व हॅण्ड्स-फ्री अनुभव देतो. नवीन एक्स३ सिरीजमध्ये न्यू स्लिम रिमोट कंट्रोलसह किमान डिझाइन आणि गुगल असिस्टण्ट, नेटफ्लिक्स, यूट्यूब व गुगल प्ले साठी समर्पित कीज आहेत.
इन्फिनिक्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिष कपूर म्हणाले, “इन्फिनिक्स नेहमीच नवोन्मेष्कारासंदर्भात अग्रस्थानी राहिला आहे आणि महत्त्वाकांक्षी ग्राहकांच्या सर्वसमावेशक मनोरंजन गरजांची पूर्तता करणारी उत्पादने निर्माण करत आला आहे. या ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञान ट्रेण्ड्स चांगल्यारित्या माहित आहेत आणि ओटीटी व्यासपीठांवर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ कन्टेन्ट पाहतात. आम्ही लाँच केल्यापासून फ्लिपकार्टवर आमच्या एक्स१ स्मार्ट टीव्ही सिरीजला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामधून ही बाब प्रकर्षाने दिसून येते आणि विकास देखील अद्भुत राहिला आहे. आमची नवीन एक्स३ स्मार्ट टीव्ही सिरीज किफायतशीर दरामध्ये सर्वोत्तम व्युइंग अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.”