जिल्हयातील ब्लॅक स्पॉटचे तातडीने डीपीआर तयार करा खा.गोडसेच्या प्रशासनाला सुचना

0

नाशिक,१६ नोव्हेंबर २०२२- माणसाचं आयुष्य लाख मोलाचं असतं . क्षणार्धात अपघात होऊन माणसं मृत्युमुखी पडतात . यामुळे त्यांचं अवघं कुटुंबच उध्वस्त होतं . अपघात हा विषय खुपच संवेदनशील आणि चिंताजनक आहे . अनेकदा अपघात प्रशासकिय उपाययोजनांच्या अभावामुळे होत असतात . अपघात टाळणे हे जरी आपल्या समोर आव्हान असले तरी अशक्य असे काहीच नाही अपघात टाळण्यासाठीच्या उपाययोजना फक्त अपघाताचा आकडा कमी करण्यासाठी नसला पाहिजे तर अपघात होऊ नये हा उपाययोजना करण्यामागील प्रामाणिक हेतु असायला हवा , असे मौलीक मत मांडत जिल्हयातील एकूण ब्लॅक स्पॉटचे मेजर , मिडीयम आणि मायनर या सदराखाली वर्गीकरण करून तातडीने डीपीआर तयार करण्याच्या सूचना संसदीय सदस्य रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष खा . हेमंत गोडसे यांनी केल्या .

संसदीय सदस्य रस्ता समितीची बैठक आज समिती अध्यक्ष खा.गोडसे आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ . भारतीताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली . यावेळी मार्गदर्शन करतांना खा . गोडसे यांनी वरील सुचना दिल्या . याप्रसंगी जिल्हाधिकारी डी . गंगाधरण व सहाय्यक जिल्हाधिकारी जतिन रहेमान , जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयेशा मित्तल , पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे , पोलिस अधिक्षक शहाजी उमप , महानगरपालिका उपआयुक्त अर्चना तांबे , प्रादेशिक परिवहन अधिकरी प्रदिप शिंदे , राष्ट्रीय महामार्ग विभागाचे भाऊसाहेब साळुंके , दिलीप पाटील , प्रशांत देशमुख , गणेश मिसाळ , आदि अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते . जिल्हयातील राष्ट्रीय महामार्गावर त्रेचाळीस राज्य मार्गावर पस्तीस इतर रस्त्यांवर बावन्न , नाशिक पोलिस आयुक्तालय हद्दीत तेवीस , तर नाशिक ग्रामिण हद्दीत त्रेचाळीस ब्लॅक स्पॅट असल्याची माहीती समोर आली आहे .

Instructions to the administration of Mr. Godse to immediately prepare the DPR of the black spot in the district

वरील ब्लॅक स्पॉटवर सतत अपघात होत असल्याने मृतांच्या आकडेवारीत प्रतिवर्ष वाढ होत आहे . याची गंभीर दखल संसदीय सदस्य रस्ता समितीचे अध्यक्ष या नात्याने खा . गोडसे यांनी घेतली आहे . अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी येत्या १५ डिसेंबर २०२२ पर्यंत सर्वच ब्लॅक स्पॉटवर साईन बोर्ड , कॅटआई , साईड पट्टया , कॉमेरे , हायमास्ट , पथदिपे , बसवावेत अन्यथा कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी खा . गोडसे यांनी दिला आहे .

शाळकरी विद्यार्थ्यांना ने – आण करण्यासाठी असलेल्या रिक्षा आणि बसेसमध्ये प्रमाणापेक्षा अधिक विद्यार्थी असतात . जिल्हयात सर्वत्र अवैद्य वाहतुकीचे प्रमाण वाढले असून याला पायबंद बसणे गरजेचे असल्याचे यावेळी नामदार भारती पवार यांनी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणुन दिले . इंदिरानगर , व्दारका, राणेनगर ,मुंबईनाका येथील वाहतुक कोंडीवर लवकारांत लवकर तोडगा काढण्याच्या सुचना खा.गोडसे यांनी करत वेगाने वाहने चालविणाऱ्या व ओव्हरटेक तसेच लेन कटींग – करणाऱ्यांवर कठोरात कठोर कार्यवाही करण्याचे आदेश गोडसे यांनी दिले .

अपघात टाळण्यासाठी जिल्हा परिषद , महानगरपालिका , शहर पोलिस , ग्रामिण पोलिस , आर.टी.ओ. सार्वजनिक बांधकाम या विभागाने एकत्रित काम करणे गरजेचे असून जिल्हयातील एकूण ब्लॅक स्पॉटचे मेजर, मिडीयम आणि मायनर या सदराखाली वर्गीकरण करून त्याचा तातडीने डीपीआर तयार करण्याच्या सुचना संसदीय सदस्य रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष खा . हेमंत गोडसे यांनी केल्या .

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.