नाशिक – येत्या ३ डिसेंबर पासून नाशिकच्या METच्या कुसुमाग्रज नगरीत आयोजीत ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुलेखनकार अच्युत पालव यांचा “ऐसी अक्षरे “हा सुलेखनावर आधारित प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम शनिवार ४ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात अच्युत पालव संत ज्ञानेश्वर आणि संत रामदास यांनी रचलेल्याकाही निवडक शब्द रचना घेऊन कॅनव्हासवर काम करणार आहेत. हे चालू असताना प्रसिद्ध गायिका मेघना देसाई गाणार आहेत.
६ फूट बाय ४ फुटाचे चार कॅनवास अच्युत पालव साकार करणार आहेत. गायन आणि सुलेखन अशी वेगळी मेजवानी साहित्य प्रेमींना ऐकायला आणि पाहायला मिळणार आहे.
मध्यवर्ती हिरवळीवर ४ डिसेंबर २०२१ ला सकाळी ११ वाजता मध्यवर्ती हिरवळीवर हा कार्यक्रम होणार आहे.