मुंबई,दि.१८ जुलै २०२३ – भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील कथित व्हायरल व्हिडीओवरून राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.किरीट सोमय्या यांच्या कथित वादग्रस्त व्हायरल व्हिडिओप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.हा मुद्दा आपण अधिवेशनात उचलणार असल्याचं अंबादास दानवेंनी सोमय्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
माजी खासदार व भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा खळबळजनक व्हिडिओ लोकशाही वृत्तवाहिनीवर प्रसारित झाल्यानंतर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सोमय्या आक्षेपार्ह स्थितीत दिसून येत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ माजली असून विरोधकांकडून भाजप व सोमय्यावर टीकेची झोड उठवण्यात येत असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणीही केली जात आहे.
या घटना कुठे झाल्या, कशा झाल्या आता याबाबत गृहमंत्रालयाने याविषयी चौकशी केली पाहिजे.अशी हि मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.
‘असं ऐकतो आहे की,त्यांच्याविरोधात अनेक महिलांनी तक्रार केले आहेत. माझे पंतप्रधान, गृहमंत्री ईडी यांच्याशी माझे फार जवळचे संबंध आहेत. ते सगळे माझ्या तालावर नाचतात.म्हणून काही लोकांना ब्लॅकमेल केल्याच्या तक्रारीसुद्धा काही ठिकाणी आल्या आहेत..असं माझ्या कानावर आलं आहे.’ अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.
किरीट सोमैय्या यांचे आक्षेपाहार्य व्हिडियो @LokshahiMarathi चॅनेल दाखवत आहे. माझ्याकडे @KiritSomaiya यांच्याबाबत अनेक तक्रारी असल्याची माहिती आहे. पण माझ्यासाठी तक्रारी करणाऱ्या त्या महिलांची सुरक्षा अधिक महत्वाची आहे. योग्य व्यासपीठावर मी हा विषय मांडणार आहे. #kiritsomaiyya
— Ambadas Danve (@iambadasdanve) July 17, 2023