IPL 2025 Final–RCB vs PBKS अंतिम सामना आज!पिचवर धावांचा पाऊस की गोलंदाजांचा कहर?
विजेतेपदासाठी कोणी भारी ? पिच रिपोर्ट:फलंदाजांचा जलवा?
अहमदाबाद, ३ जून २०२५ – IPL 2025 Final आज संध्याकाळी ७:३० वाजता IPL 2025 चा थरारक अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु (RCB) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात रंगणार आहे. दोन्ही संघांनी कधीही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही, त्यामुळे आज एक नवीन चॅम्पियन क्रिकेटविश्वाला मिळणार आहे.
🔍 पिच रिपोर्ट: फलंदाजांचा जलवा?( IPL 2025 Final)
नरेंद्र मोदी स्टेडियमची पिच फलंदाजांना अनुकूल आहे. या मैदानावर या हंगामात झालेल्या ८ पैकी ७ सामन्यांमध्ये २०० हून अधिक धावा झाल्या आहेत. बॉल बॅटवर सहज येतो आणि उंचीही समतोल आहे, त्यामुळे आजच्या सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
🌦 हवामान अहवाल: पावसाचा धोकाही कायम!
आज अहमदाबादमध्ये दिवसा 60% पावसाची शक्यता आहे, पण सामन्याच्या वेळेत म्हणजेच संध्याकाळी मौसम साफ राहण्याची अपेक्षा आहे. तापमान सुमारे ३८°C वरून २७°C पर्यंत खाली येईल. ह्यूमिडिटी ६०% च्या आसपास राहील. रिझर्व डे ४ जून राखीव आहे. पण जर तोही पावसात गेला, तर पंजाब किंग्स विजेता ठरेल, कारण त्यांनी लीग स्टेजमध्ये अव्वल स्थान पटकावलं होतं.
🆚 RCB vs PBKS: हेड-टू-हेड ट्रॅक रेकॉर्ड
दोन्ही संघांमध्ये एकूण ३६ सामने झाले आहेत, त्यात १८-१८ ची बरोबरी आहे.
मात्र, शेवटच्या ६ पैकी ५ सामने RCB ने जिंकले आहेत, त्यामुळे त्यांचा फॉर्म सध्या चांगला आहे.
क्वालिफायर-१ मध्ये RCB ने पंजाबचा ८ गडी राखून पराभव केला होता – त्यामुळे मनोवैज्ञानिक आघाडी RCBकडे आहे.
Captain’s Photoshoot – ✅😎
Pre-match Press Conference – ✅🎙
All eyes 👀 on #TATAIPL Final tomorrow ⌛#RCBvPBKS | #Final | #TheLastMile | @RCBTweets | @PunjabKingsIPL pic.twitter.com/tGdWKbZUhp
— IndianPremierLeague (@IPL) June 2, 2025
👑 कर्णधारांची कमाल: अय्यरचा जोश vs पाटीदारचा होश
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील PBKS ने अनकेप्ड खेळाडूंना संधी देत त्यांच्यात चमक आणली. प्रशिक्षक रिकी पोंटिंग यांचं मार्गदर्शनही महत्त्वाचं ठरलं.
रजत पाटीदार यांचा शांत नेतृत्वशैली आणि सुसंगत खेळ RCB ला थेट फाइनलमध्ये घेऊन आला – आणि त्यांचं एकमेव ध्येय आहे: विराट कोहलीला पहिलं विजेतेपद देणं!
⚔ इतिहास घडणारच!
RCB चा हा चौथा IPL Final: २००९, २०११, २०१६ ला पराभवाचा सामना.
PBKS चा दुसरा Final: २०१४ मध्ये KKR कडून हार.
आज रुचणार कोणी इतिहास,आणि कोणाचे स्वप्नभंग होणार – हे पाहणं रोमांचकारी ठरणार आहे!
[…] IPL 2025 Final–RCB vs PBKS अंतिम सामना आज!पिचवर धावां… […]
[…] गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती समोर आली […]