अहमदाबाद,दि,२ जून २०२५ –IPL 2025 finalअखेर IPL 2025 स्पर्धेला नवा चॅम्पियन मिळणार हे निश्चित झाले आहे! आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्सने ५ वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सचा पराभव करत थेट फायनलमध्ये धडक मारली.
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २०४ धावांचे भक्कम लक्ष्य दिले. पण पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याने स्फोटक फलंदाजी करत केवळ ५ गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठले आणि संघाला ११ वर्षांनंतर IPL फायनलमध्ये स्थान मिळवून दिलं.
आता ३ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता नरेंद्र मोदी स्टेडियमवर IPL 2025 चा अंतिम सामना पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) यांच्यात रंगणार आहे. विशेष बाब म्हणजे या दोन्ही संघांनी आजपर्यंत एकदाही IPL ट्रॉफी जिंकलेली नाही, त्यामुळे यंदाचा चॅम्पियन नवा असणार आहे हे निश्चित!
श्रेयस अय्यरच्या दमदार नेतृत्वामुळे आणि फलंदाजीमुळे पंजाबने मुंबईचा अडथळा पार करत ऐतिहासिक अंतिम फेरी गाठली. आता सर्वांचे लक्ष मंगळवारच्या महा-सामन्यावर लागले आहे.
प्लेऑफमधील या नियमामुळे होणार फायदाच!(IPL 2025 final)
आता बोलूया BCCI च्या त्या नियमाबद्दल, जो सर्वप्रथम पंजाब आणि मुंबई या संघांवर लागू होतो. हा नियम आहे पाऊस किंवा इतर कारणांमुळे होणाऱ्या व्यत्यय संबंधित.
खरंतर पंजाब आणि मुंबई यांच्यातील सामन्यात पावसामुळे उशीर झाला. आणि जर हा सामना पूर्णपणे पावसामुळे रद्द झाला असता, तर याचा फायदा पंजाब किंग्स संघाला मिळाला असता.
हे कारण ?
कारण IPL 2025 हंगामासाठी BCCI च्या ‘प्लेइंग कंडीशन्स’मध्ये स्पष्टपणे नमूद आहे की, जर प्लेऑफ सामन्यात निकाल लागण्यासाठी सगळ्या शक्यता फसतात, तर गटसाखळीमध्ये पहिले स्थान मिळवलेल्या संघालाच विजेता घोषित केले जाते.
यामुळे, जर सामना रद्द झाला असता, तर पंजाब किंग्स टेबल टॉपर असल्यामुळे थेट विजेता ठरले असते.
पंजाब बनू शकते IPLचॅम्पियन
आत्तापर्यंत BCCI ने IPL फायनलसाठी रिझर्व्ह दिवसाची अधिकृत घोषणा केलेली नाही, मात्र तसा निर्णय होण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा, जर मुख्य दिवशी आणि रिझर्व्ह दिवशीही पावसामुळे सामना होऊ शकला नाही, तर ICC टूर्नामेंट्सप्रमाणे दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाणार नाही.याच्या उलट, गटसाखळीत ज्या संघाची कामगिरी सर्वोत्तम असेल, त्यालाच विजेता घोषित करण्यात येईल.
आता हे स्पष्ट आहे की पंजाब किंग्स पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर होती आणि बेंगळुरू दुसऱ्या. त्यामुळे पंजाब IPL 2025 ची चॅम्पियन होऊ शकते.
मात्र, जर फायनलमध्ये पंजाबऐवजी मुंबई इंडियन्स पोहोचली, तर या नियमाचा फायदा बेंगळुरूला मिळेल, कारण बेंगळुरू दुसऱ्या स्थानावर होती आणि मुंबई चौथ्या.
Pressure’s loud. Those maximums were louder 🚀
🎥 Captain Shreyas Iyer puts #PBKS on the brink of a seat in the GRAND FINAL ❤
Updates ▶ https://t.co/vIzPVlDqoC#TATAIPL | #PBKSvMI | #Qualifier2 | #TheLastMile | @ShreyasIyer15 pic.twitter.com/tTiXcELxoG
— IndianPremierLeague (@IPL) June 1, 2025
[…] […]
[…] RCB ला पहिलं IPL विजेतेपद मिळालं. विराट कोहलीसाठी हा क्षण भावनिक ठरला. त्याने […]