युद्धबंदीच्या घोषणेनंतर इराणचे मिसाइल हल्ले सुरूच;ट्रम्पच्या घोषणेवरून जगभरात टीका
खामेनेईंचा इशारा: कोणत्याही परिस्थितीत झुकणार नाही
तेल अवीव / तेहरान | २४ जून २०२५ –Iran Missile Attack अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराण-इस्त्रायल संघर्षावर युद्धबंदी जाहीर करताच फक्त काही तासांत इराणने पुन्हा मिसाइल हल्ले सुरू करून ट्रम्प यांना तोंडावर आपटवलं आहे. ट्रम्प यांनी आपण युद्ध थांबवलं असल्याचा ट्विटद्वारे दावा केला होता, मात्र त्याच्या अवघ्या काही वेळातच इराणने इस्त्रायलवर जोरदार हल्ला चढवला.
या हल्ल्यात तीन इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला असून, इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजत आहेत. लोक बंकरमध्ये धावत आहेत, अशा स्थितीत युद्धबंदीची घोषणा केवळ दिखावा ठरली आहे.
इराणचा अमेरिकेलाही इशारा: कतर व इराकमधील अमेरिकन तळांवर हल्ले(Iran Missile Attack )
इराण केवळ इस्त्रायलवर नव्हे, तर अमेरिकेच्या मिडल ईस्टमधील तळांनाही लक्ष्य करत आहे. कतरमधील अल-उदीद एअरबेस आणि इराकमधील तीन अमेरिकन ठिकाणांवर मिसाइल हल्ले करण्यात आले.
अमेरिकेने यातील बुहतांश क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केल्याचा दावा केला आहे, त्यामुळे मोठ्या नुकसानाची माहिती नाही.
अल-उदीद एअरबेस ही अमेरिकेच्या CENTCOM (Central Command) ची मध्यपूर्वेतील प्रमुख एअर ऑपरेशन्स बेस आहे.
Iran’s latest strike sends a clear message to the enemy: if repeated, complete destruction awaits you.
Images of the destructions following Iran’s latest missile attack on the Zionist occupying regime in Be’er Sheva, before the ceasefire was established. pic.twitter.com/6QsemeuybV
— Daily Iran Military (@IRIran_Military) June 24, 2025
खामेनेईंचा इशारा: कोणत्याही परिस्थितीत झुकणार नाही
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिले आहे:
“आम्ही कुठल्याही परिस्थितीत हल्ला सहन करणार नाही. आम्ही कोणासमोर झुकणार नाही.”
इराणचे परराष्ट्र मंत्री म्हणाले:
“अमेरिकेच्या कोणत्याही हल्ल्याला इराण सडेतोड प्रत्युत्तर देईल.”
ट्रम्पच्या घोषणेवरून जगभरात टीका
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःची पाठ थोपटत युद्धबंदीची घोषणा केली होती. मात्र त्यांचा हा दावा क्षणातच फोल ठरला, आणि त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर टीकेचा भडिमार होत आहे. भारत-पाकिस्तानप्रमाणेच इथेही त्यांनी अर्धवट मध्यस्थी करत परिस्थिती आणखी गुंतवून टाकली असल्याची चर्चा आहे.
🔴 महत्वाचे मुद्दे:
ट्रम्पच्या शस्त्रसंधी घोषणेनंतर इराणचे हल्ले सुरू
तीन इस्रायली नागरिकांचा मृत्यू
कतर आणि इराकमधील अमेरिकन तळांवर मिसाइल हल्ले
CENTCOM बेसवर हल्ल्याचा प्रयत्न
इराणचे “झुकणार नाही” धोरण