IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं अब्जोंचं घबाड –३.५ किलो सोने, २ किलो चांदी आणि १ कोटी रोकड

0

नवी दिल्ली, ३ जून २०२५ – IRS officer bribe case केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने (CBI) मोठ्या कारवाईत २००७ बॅचचे वरिष्ठ आयआरएस अधिकारी अमित कुमार सिंगल आणि हर्ष कोटक यांना लाच घेताना रंगेहाथ अटक केली. ४५ लाख रुपयांच्या मागणीच्या प्रकरणात २५ लाखांची पहिली लाच स्वीकारताना(IRS officer bribe case) अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली.

तपासादरम्यान दिल्लीतील वसंत कुंज परिसरात सिंगल यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला. यावेळी ३.५ किलो सोने, २ किलो चांदी, १ कोटी रुपये रोकड, २५ बँक खात्यांची कागदपत्रे, तसेच दिल्ली, मुंबई आणि पंजाब येथील मालमत्तेचे दस्तऐवज जप्त करण्यात आले.

सीबीआयकडून या संपूर्ण संपत्तीचा तपशीलवार तपास आणि उत्पत्तीचा मागोवा घेतला जात आहे. रविवारी दोन्ही अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

अटक झालेले अधिकारी अमित कुमार सिंगल सध्या दिल्लीतील आयटीओ येथील सीआर बिल्डिंगमध्ये अतिरिक्त महासंचालक (करदाता सेवा संचालनालय) म्हणून कार्यरत होते. ही घटना आयकर विभागातील भ्रष्टाचारावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!