ऑपरेशन ‘अजय’च्या माध्यमातून इस्रायलमधून भारतात परतले २१२ भारतीय

0

नवी दिल्ली,दि. १३ ऑक्टोबर २०२३ –इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे तेथील परिस्थिती बिकट होत चालली आहे. दरम्यान, इस्रायलमध्ये ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे, ती लक्षात घेऊन भारत सरकारने ऑपरेशन ‘अजय’ सुरू केले आहे. इस्रायलहून एअर इंडियाचे ११४० विमान २१२ भारतीयांना घेऊन ५:५४ वाजता दिल्ली विमानतळावर उतरले.इस्रायलमधून भारतात परत येऊ इच्छिणाऱ्या भारतीयांना परत आणणे हा त्याचा उद्देश आहे.

हमासच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये प्राण गमावलेल्या लोकांची संख्या सुमारे १३०० आहे,तर ३४१८ लोक जखमी झाले आहेत.त्याच वेळी,गाझामध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात १,५३७ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ६,६१२लोक जखमी झाले आहेत. इस्रायलमध्ये १५०० हून अधिक हमासचे सैनिकही मारले गेले आहेत.

भारत सरकारने ऑपरेशन ‘अजय’ सुरू केले आहे.इस्रायलमधून भारतात सर्व प्रवाशांना सुखरूप घरी पोहोचवण्यात आले आहे. भारत सरकारतर्फे ऑपरेशन अजय चालवण्यात येत आहे, ज्याद्वारे भारतीय इस्रायलमधून परतत आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.