ईरान-इस्राइल संघर्ष शिगेला;१०० हून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी इस्राइलवर हल्ला

अमेरिका-ईरान परमाणु कराराला धक्का:डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा –"वेळ संपली"

1

तेहरान/यरुशलम, दि. १३ जून २०२५ – Israel Iran Tension Live पश्चिम आशियात तणावाने उग्र स्वरूप धारण केले असून, इस्राइलने केलेल्या हवाई हल्ल्याच्या प्रत्युत्तरात ईरानने जोरदार पलटवार करत १०० हून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र इस्राइलवर डागले आहेत. ईरानच्या IRNA सरकारी वृत्तसंस्थेनुसार, या मोहिमेला ‘कठोर शिक्षा (Severe Punishment)’ असे नाव देण्यात आले आहे.

🔥 युद्धाचा उद्रेक:(Israel Iran Tension Live)
गेल्या शुक्रवारी सकाळी इस्रायली डिफेन्स फोर्सेस (IDF) ने ईरानच्या विविध लष्करी तळांवर हवाई हल्ले केले होते. या कारवाईत ईरानच्या २० वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला असून, यामध्ये त्यांचा परमाणु कार्यक्रम प्रमुख देखील होता, अशी माहिती समोर आली आहे.

⚔️ अयातुल्ला खामेनेई यांचा इशारा:
ईरानचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनेई यांनी इशारा दिला आहे की, “हे युद्ध सुरू झालं आहे, संपलेलं नाही.” त्यांनी सांगितले की, “हे केवळ सूड नाही, तर एक संदेश आहे की इस्राइलला त्याच्या गुन्ह्यांसाठी किंमत मोजावी लागेल.”

🚨 यरुशलममध्ये सायरन, दहशतीचं वातावरण:
ईरानच्या मिसाइल हल्ल्यानंतर यरुशलममध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजले, आणि काही ठिकाणी स्फोटांचे आवाज देखील ऐकायला मिळाले. नागरिकांना सुरक्षित स्थळी आश्रय घेण्यास सांगण्यात आलं आहे.

अमेरिका-ईरान परमाणु कराराला धक्का:
ईरानने इस्राइलच्या हल्ल्यानंतर अमेरिकेसोबत सुरु असलेली परमाणु करार वार्ता थांबवण्याची घोषणा केली आहे. ईरानी परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं की, “जेव्हा एखाद्या राष्ट्रावर आक्रमण होत आहे, तेव्हा कूटनीतीला कोणताही अर्थ राहत नाही.”

🗣️ ट्रम्प यांचा इशारा:
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना ईरानला इशारा दिला आहे. “आम्ही त्यांना ६० दिवसांचा अल्टिमेटम दिला होता, आज ६१वा दिवस आहे,” असं सांगत त्यांनी ईरानवर कारवाई करण्याची चेतावणी दिली आहे.

⚠️ घडामोडींचा संक्षिप्त आढावा:
इस्राइलने हल्ला करून ईरानच्या अणु प्रमुखास ठार मारले
ईरानचा पलटवार – १०० पेक्षा अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागली
यरुशलममध्ये हवाई हल्ल्याचे सायरन व स्फोट
अयातुल्ला खामेनेई – “हे युद्ध आहे, बदला सुरू झाला आहे”
अमेरिका-ईरान अणु चर्चा रद्द
डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा –”वेळ संपली”

 

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] ईरान-इस्राइल संघर्ष शिगेला;१०० हून अध… […]

Don`t copy text!