(हरिअनंत,नाशिक)मीन राशीचा स्वामी गुरु आहे.गेल्या आठ भागापासून आपण मीन राशीला लागणाऱ्या साडेसाती विषयी चर्चा करीत आहोत; या चर्चेचे महत्वपूर्ण कारण म्हणजे मीन राशींच्या व्यक्तींना सावध करणे.२९ एप्रिल २०२२ या दिवशी शनीे राशी परिवर्तन करून मीन राशीत प्रवेश करणार आहे यामुळे ज्यांची जन्मरास मीन आहे त्यानी अतिशय सावधानपूर्वक आपलं प्रत्येक कार्य करायचे आहे.
मीन राशीची ही साडेसाती साडेतीन महिन्यांची आहे. १३ जुलै २०२२ रोजी शनी पूर्वरीत राशी परिवर्तन करताच मीन राशीची साडेतीन महिन्याची साडेसाती समाप्त होणार, पण या साडेतीन महिन्यात शनी मीन राशीची कसून तपासणी करणार. तपासणी सोबत उत्तम कर्म करणाऱ्या मीन राशींच्या व्यक्तींना योग्य फल ही देणार,चुकीची कर्म करणाऱ्यांना शनी दंडित ही करणार.
या साडेतीन महिन्यात मीन राशींच्या व्यक्तींनी कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेऊ नये, आपला व्यवसाय बदलण्याची प्रयत्न करू नये.स्थावर प्रॉपर्टी घाईगर्दीत विकण्याचा प्रयत्न करू नये. विश्वासाने खूप मोठी रक्कम कुणाला देऊ नये. कारण नसताना कुणाच्या कोर्ट-कचेरीच्या कामात स्वतःला गुंतवून घेऊ नये.आपल्या गर्विष्ठ अहंकाराने कुणाचा जाणीवपूर्वक अपमान करू नये. साडेसाती शनीच्या तीन चरणांची असते. प्रथम चरणात अतिशय सावधानता बाळगली आणि कर्म जर उत्तम असतील तर साडेसातीचा मुळीच घाबरायचे नाही.
शनीच्या साडेसातीची भीती बाळगण्यापेक्षा साडेसातीला समजून घेणे महत्वाचे आहे. मीन राशीला लागणाऱ्या या साडेतीन महिन्याच्या साडेसातीचा परिणाम मीन राशींच्या व्यक्ती सोबत परिवारातील व्यक्तींवर ही होतो या कारणे साडेसाती सुरू असणाऱ्या व्यक्तीने उगाच आपल्या घरात छोट्याश्या गोष्टीवरून शाब्दिक वाद करू नये..
शनीची साडेसाती प्रत्येकाच्या जीवनात जास्तीत-जास्त तीन वेळा येते.शनीची साडेसाती,शनीचा ढय्या, ढय्या म्हणजे अडीच वर्षाची साडेसातीच असा हा अडीच वर्षाचा शनीचा ढय्या मिथुन आणि तुला राशीला सुरू आहे ..मीन राशीत शनी प्रवेश करताच धनु राशीची साडेसाती संपूर्णपणे समाप्त होणार. शनीची साडेसाती ही व्यक्तीच्या जन्म राशीला लागत असते,”टोपण नावाला नाही”.शनीच्या साडेसातीचा परिणाम हा व्यक्तीने केलेल्या चांगल्या- वाईट परिणामावर अवलंबुन असतो. 13 जुलै 2022 ला मीन राशीची साडेसाती समाप्त होते आणि जानेवारी २०२३ ला मिनराशीची साडेसाती पुनः आरंभ होते (क्रमशः) भाग : १५८
साडेसाती विषयी.. काळजी, स्वभाव सावधानता, आजार, व्यवसाय, आणि त्यावरील उपाय.काही अडचण, शनि विषयी काही शंका, पत्रिका व्यवस्थित असून अडचणी सुटत नसेल, तर ‘विनामूल्य मार्गदर्शन ‘ सकाळी ११ ते १ पर्यन्त तुम्ही मला 9096587586 या नंबर वर कॉल करू शकता,…हरीअनंत
