प्रत्येक जिल्हयात रोजगार मेळाव्याचे आयोजन करणे ही काळाची गरज – ना. सामंत

खासदार रोजगार मेळाव्यातून १२७४ बेरोजगारांना थेट नियुक्तीपत्र

2

नाशिक ,४ डिसेंबर २०२२ – रोजगार उपलब्ध करून देणे हे आज मितीस सर्वात मोठे काम आहे.मुख्यमंत्री रोजगार निर्मिती या योजनेच्या माध्यमातून शासन राज्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे.खासदार गोडसे यांनी बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आयोजित केलेला खासदार रोजगार मिळावा हा स्तुत्य आणि अतुलनीय उपक्रम असून प्रत्येक जिल्ह्यात असे रोजगार मेळावे होणे हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांनी केले आहे.दरम्यान आजच्या खासदार रोजगार मेळाव्यातून निवड झालेल्या १२७४ बेरोजगार तरुणांना कार्यक्रमातच थेट नियुक्तीपत्र देण्यात आले.

युवती सेनेच्या भक्ती अजिंक्य गोडसे यांच्या संकल्पनेतून शहरातील औरंगाबाद रोडवरील लक्ष्मी लॉन्सवर आयोजित केलेल्या खासदार रोजगार मेळाव्यात बोलताना ना.सामंत यांनी वरील प्रतिपादन केले.यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे,खा.हेमंत गोडसे,नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखरपाटील,सौ भक्ती गोडसे,जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे,शहरप्रमुख प्रवीण तिदमे,महंत सुधीरदास पुजारी,महिला आघाडीच्या लक्ष्मीबाई ताठे , डिस्टीलचे किरण रहाणे,निपमचे बारी आदी मान्यवर उपस्थित होते.आम्हाला हेवेदावे आणि राजकारणात रस नसल्याने आमच्याकडून सततच लोकाभिमुख कार्य आणि विकास कामे सुरूच आहे.याबरोबरच समाजातील कुटुंबविकास होणे महत्त्वाचे आहे.तरुणांना रोजगार मिळाला तर आर्थिक प्रगती होऊन त्यांच्या कुटुंबाचा विकास होईल या सकारात्मक विचारातून आजच्या रोजगार मेळाव्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी खा.गोडसे यांनी दिली.

It is the need of the hour to organize employment fairs in every district - samant

राज्यात सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी सर्वाधिक लक्ष हे राज्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात घातले आहे.मुख्यमंत्र्याच्याच विचाराचे खा. गोडसे असल्याने त्यांनी बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचे कार्य सुरू केले आहे.या मेळाव्यातून आज शेकडो बेरोजगारांना नोकऱ्या मिळणार आहेत.ज्यांना नोकरी मिळणार नाहीत अशांनी निराश न होता आपले परिश्रम सुरूच ठेवावेत असे आवाहन पालकमंत्री भुसे यांनी उपस्थित तरूणiना केले. बेरोजगारी गुन्हेगारीला जन्म देते.तरूणांच्या हाताला काम मिळाल्यास ते गुन्हेगारीकडे वळणार नाहीत.म्हणून खा.गोडसे यांनी आयोजित केलेल्या खासदार रोजगार मेळाव्यास अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.शेखर पाटील यांनी सांगितले.

राज्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना सुरू आहे.गेल्या तीन वर्षांमध्ये शासनाने या योजनेसाठी केवळ १७० कोटी रुपये खर्च केले.तर सत्तातंर झाल्यानंतर अवघ्या चार ते पाच महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी ५०० कोटी रुपयांचे अनुदान दिले असून विद्यमान सरकार धोरण बेरोजगारीचे उच्चाटन करणे असल्याचे स्पष्ट्र करत तरूणांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे ना.उदय सामंत यांनी स्पष्ट्र केले.खासदार गोडसे यांनी बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आयोजित केलेला खासदार रोजगार मिळावा हा उपक्रम अभिनंदनीय असून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात असे रोजगार मेळावे होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांनी केले.

दरम्यान मेळाव्याचे सर्वेसर्वा भक्ती गोडसे यांच्या हस्ते आजच्या मेळाव्यातून निवड झालेल्या १२७४ तरूणांना नियुक्तपत्र देण्यात आले.थेट नोकरीचे नियुक्तीपत्र मिळाल्याने तरुणांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मेळाव्यात ३८०० जणांनी सहभाग घेतला होता. ९८८ जणांना शॉर्टलिस्ट केले असून लवकरच त्यांना दुसऱ्या फेरीसाठी बोलविण्यात येणार आहे.सुमारे पंधराशे जणांना कौशल्य विकास योजनेतंर्गत प्रशिक्षणासाठी निवड झाल्याची माहिती मेळा०याचे आयोजक भक्तीताई गोडसे यांनी दिली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

2 Comments
  1. Vishal Ravji gangode says

    Navkri

    1. Vishal Ravji gangode says

      नोकरी विषयी

कॉपी करू नका.