नाशिक,दि.११ एप्रिल २०२३- थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचं अतिशय महत्वाचं पाऊल उचललं त्यामुळे आज समाजात स्त्री ला महत्वपूर्ण स्थान मिळालं आहे. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजाच्या हितासाठी वेचलं. त्यांचं हे मौल्यवान कार्य आणि त्यांचे विचार अविरत पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.
महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने वाकडी बारव जुने नाशिक येथून शोभा यात्रा व भव्य मिरवणूकीस शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी त्यांनी सर्व बांधवांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत माजी खासदार समीर भुजबळ यांनी अभिवादन केले. यावेळी काढण्यात आलेल्या शोभा यात्रेत व मिरवणुकीत ते सहभागी झाले.
यावेळी ते म्हणाले की, थोर समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले यांचं कार्य आपल्यासाठी आदर्श आहे. समाजात काम करत असताना त्यांचं कार्य आपल्याला नेहमीच प्रेरणा देत असते. त्यांचं बहुजन समाजाच्या उन्नतीचं आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्याचं काम सर्व समाज बांधवांनी अविरत पुढे नेण्याची गरज आहे. त्यांचं हे कार्य सक्षम समाजाला दिशा देणारे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार सीमा हिरे, शिवसेना उपनेते सुनील बागुल, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, ज्येष्ठ नेते बाजीराव तिडके, माजी मनपा गटनेते गजानन शेलार, महिला शहराध्यक्ष योगिता आहेर,
महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे, शशी हिरवे, मामा राजवाडे, बबलू शेलार, अमर वझरे, योगेश कमोद यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.