‘संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद देणे हे अत्यंत दुर्दैवी’; चित्रा वाघ संतापल्या

0

मुंबईसंजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्याने  भाजप  नेत्या चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी ट्वीट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. संजय राठोड यांना मंत्रिपद दिलं जाणं दुर्दैवी असल्याचं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. संजय राठोडां विरोधात माझा लढा सुरुच ठेवणार आहे,असंह चित्रा वाघ यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. राजभवनात एकूण १८ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी शिंदे गटाकडून संजय राठोड यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ घालण्यात आली आहे.

पुण्यातील तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी गेले वर्षभर चोहीकडून होणारे आरोप, ठाकरे सरकारमध्ये असताना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या संजय राठोड यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात समावेश केल्याने राठोड यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या आणि आरोपांची राळ उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या मंत्रिपदावर नाराजी व्यक्त केलीय.

राठोड यांना पुन्हा मंत्रिपद दिलं जाणं दुर्दैवी असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटलंय. तसंच राठोड यांच्याविरोधात लढा सुरुच ठेवणार असून ही लढाई जिंकणारच असा निर्धारही त्यांनी व्यक्त केलाय. ट्विटरवर मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करत वाघ यांनी राठोड यांच्या मंत्रिपदावर उघड नाराजी व्यक्त केलीय..राज्यात सत्तांतर झाल्यानंतर संजय राठोड यांना पुण्यातील तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी क्लिनचीट मिळाली आणि नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मंत्रिपदाचीही संधी दिलीय. मात्र यावरुन आता वादाची शक्यता आहे..

चित्रा वाघ यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहमाझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे….जितेंगे

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!