जम्मू,पठाणकोट,जैसलमेर पाकिस्तानचा हल्ला : पाकिस्तानचे F-१६ जेट पाडले
भारताकडून जोरदार प्रत्युत्तर ,श्रीनगर एअर पोर्ट वर हायअलर्ट (व्हिडीओ पहा )
जम्मू, ८ मे २०२५ – Jammu Attack Latest News, पाकिस्तानच्या सातत्याने सुरू असलेल्या कुरापतींना आता भारताने ठोस प्रत्युत्तर दिले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर जोरदार कारवाई केली. या कारवाईदरम्यान पाकिस्तानचे F-१६ फाइटर जेट भारताने पाडले असून, भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढत चालला आहे.
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू, पठाणकोट आणि जैसलमेर येथे हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. भारताने पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हवेतच निष्प्रभ करत त्यांच्या हल्ल्याला चोख उत्तर दिले. जम्मूमध्ये ड्रोनद्वारे हल्ला झाल्याच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, ब्लॅकआऊटही करण्यात आले आहे.
Live visuals from jammu#IndiaPakistanWar #Jammu pic.twitter.com/vk6nna2TKU
— Numainda-e-Kashmir (@THESAYED340361) May 8, 2025
जम्मूमधील ५-६ स्फोटांनी खळबळ उडाली असून, ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवाई सुरक्षा यंत्रणा तत्काळ सक्रिय करण्यात आली असून, नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
‘‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे जोरदार प्रत्युत्तर (Jammu Attack Latest News)
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर एअर स्ट्राईक करून ते उद्ध्वस्त केले. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. यानंतर पाकिस्तानने भारताच्या १५ शहरांमधील लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र याला भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर देत हवेतच उद्ध्वस्त केले. यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानच्या लाहोरमध्ये एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार सिस्टीम ड्रोन हल्ल्यांच्या माध्यमातून उद्ध्वस्त केली.त्यामुळे पाकिस्तान ने रहिवाशी भागात हल्ला करण्याचा प्रयत्न सुरूकेले असले तरी भारतीय लष्कराने हे प्रयत्न हाणून पाडले आहे.
भारताकडून लाहोरमध्येही जोरदार कारवाई करण्यात आली. ड्रोन्सच्या सहाय्याने पाकिस्तानची एअर डिफेन्स आणि रडार सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आली आहे.
"India neutralizes 8 Pakistani missiles in Jammu and Kashmir. ♥️ Jai Hind! 🙏🔥 #IndiaStrong #JaiHind #NationalSecurity" pic.twitter.com/SRyNdyGJzl
— HK Chronicle (@HK_Chronicle_) May 8, 2025