श्रीनगर,दि २२ एप्रिल २०२५ – जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू झालाय. झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील आसावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे, संगीता गनबोटे हे पर्यटक पहलगाम फिरायला गेले होते.
या हल्ल्यात संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे हे जखमी झाले आहेत.तर या हल्ल्यात दिलीप डिसले, अतुल मोने अशी मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांची नावं आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे या पुण्यातील पर्यटकांना देखील गोळी लागल्याचे समजते.
पुण्यातील ५ जणांचं कुटुंब पेहेलगामला पर्यटनासाठी गेले होते. ज्यामधे २ पुरुष आणि ३ महिला होत्या. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममधे एका व्हॅलीत पर्यटकांसह हे कुटुंब काश्मीरी पोषाख घालू न फोटो काढत होतं. त्यावेळी त्यांच्यासमोर अचानक दहशतवादी आले. या पर्यटकांना दहशतवाद्यांनी नावे विचारली. नावांवरुन त्यांचा धर्म लक्षात आला. त्यानंतर पंतप्रधान मोदींबद्दल काही वक्तव्यं करत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. पाच जणांच्या या कुटुंबातील दोन पुरुषांवर गोळ्या झाडण्यात आल्या. यापैकी एका पुरुषाला तीन गोळ्या लागल्या असून या व्यक्तीची परिस्थिती गंभीर आहे. तर दुसरा पुरुष देखील जखमी आहे.
पहलगाम हल्ल्याची माहिती पुढे याताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांना फोन करुन या हल्ल्याची माहिती घेतली. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील दिलीप डिसले आणि अतुल मोने या दोघांचा मृत्यू झाला. तर इतर दोघे जखमी आहेत. जखमींमध्ये माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. तर एस भालचंद्र राव हे राज्यातील कोणत्या भागातील आहेत याची माहिती घेतली जात आहे. दरम्यान या पर्यटकांना जी काही मदत लागेल ती मदत प्रशासन करत आहे. अशा प्रकारच्या हल्ल्याचा आम्ही निषेध करत असून त्यांचा नायनाट केल्या शिवाय आम्ही थांबणार नाही असे फडणवीस यांनी सांगितले.
https://x.com/ani_digital/status/1914725120356278492