जामतारा येथे रेल्वेचा भीषण अपघात,१२ जणांचा मृत्यू ,अनेकजण चिरडल्याची भिती

एका अफवेमुळं भयानक घडलं :वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या, बचावकार्य सुरु

0

जामतारा,दि,२८ फेब्रुवारी २०२४ -Jamtara Train Accident : झारखंड मधील जामतारा येथे बुधवारी सायंकाळच्या सुमारास रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे,रेल्वे पोलीस व स्थानिक प्रशासनाकडून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.हा अपघात करमाटांडजवळ कालाझरिया येथे झाला.

प्राप्त माहितीनुसार,जामतारा आणि विद्यासागर रेल्वे स्थानकादरम्यान एका एक्स्प्रेसला आग लागल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली होती.यानंतर ट्रेनमध्ये खळबळ माजली होती.आगीची माहिती मिळताच रेल्वेमधील प्रवासी घाईघाईने रेल्वेतून बाहेर पडत असताना त्यांना दुसऱ्या रुळावरून भरधाव वेगाने येणाऱ्या झाझा-आसनसोल रेल्वेने चिरडले.दुसऱ्या रुळावरून येणारी ट्रेन प्रवाशाना न दिसल्यामुळे ट्रेन जवळ येताच प्रवाशांचा पळापळ झाली. त्यात काही प्रवासी ट्रॅकवरच  पडले. त्याना अक्षरश: कापतच रेल्वे पुढे गेली.

दुसरीकडे रेल्वेकडून सांगण्यात येत आहे की, चेन ओढल्यामुळे रेल्वे थांबवण्यात आली होती.त्यानंतर काही लोक रेल्वे रुळ ओलांडत असताना समोरुन येणाऱ्या रेल्वेने प्रवाशांना चिरडले.

आग लागल्यामुळे रेल्वेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न
याच लाईनवरुन बंगळुरू-यशवंतपूर एक्सप्रेस जात असल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, लाईनच्या बाजूला टाकलेल्या गिट्टीची धूळ उडत होती.मात्र धूळ पाहून गाडीला आग लागल्याचे आणि धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे प्रवाशीही ट्रेनमधून लगेच उतरले. त्यांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मार्गावर जाणाऱ्या ट्रेनची धडक बसून अनेक प्रवाशांचा मृत्यू झालाय.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.