नाशिक – नाशिकच्या सांस्कृतिक आणि कला जीवनात आपल्या सर्जनशील आणि वेगळ्या कामाने परिचित असलेल्या ‘जनस्थान’ या व्हॉट्स ॲप ग्रुपच्यावतीने २० ते २५ जून अशा पाच दिवस चाललेल्या वर्धापनदिन महोत्सवातील आजच्या सांगता सोहळ्यात ‘नृत्यरंग’ हा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृहात रंगणार आहे.अशी माहिती जनस्थानचे प्रमुख अभय ओझरकर यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन सचिन शिंदे यांचे असून नृत्य दिग्दर्शनासह किर्ती भवाळकर,अदिती पानसे, सुमुखी अथणी यांचे असून या तिघी प्रत्यक्ष नृत्य प्रस्तुतीही करणार आहेत. यात विद्या करंजीकर, दीपक करंजीकर, कांचन पगारे,किरण भालेराव, पल्लवी पटवर्धन, पूजा गोरे, नुपूर सावजी, भूषण मटकरी, क्षमा देशपांडे, ईश्वर जगताप, गणेश शिंदे, लक्ष्मी पिंपळे, मिलिंद धटिंगण, मुकुंद कुलकर्णी, रवी जन्नावार, पल्लवी जन्नावार, पूर्वा सावजी, रेखा केतकर, ऋचा शहा, अदिती मोराणकर,सई मोरणकर स्नेहल एकबोटे, विनायक रानडे, निवेदिता मदाने, ललित निकम, विनोद राठोड यांचेही नृत्याविष्कार नाशिककरांना अनुभवता येणार आहे, या कार्यक्रमाची रंगभूषा माणिक कानडे तसेच एन. ललित मेकअप ॲकॅडमी हे करणार आहेत तरी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन ग्रुपचे स्वानंद बेदरकर यांनी केले आहे.