नाशिक ,दि,१ फेब्रुवारी २०२५ –चहा हा माणसाच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. त्याच्याभोवती अनेक आठवणी पेरून ठेवलेल्या असतात. चहा घेतानाच अनेकांची मैत्री जमलेली असते, तर चहा घेतानाच अनेकांची भांडणेही झालेली असतात. कॉलेजलाईफमध्ये तर हा चहा म्हणजेच सर्वस्व असतो. त्याच्याशी अनेक भावना निगडीत असतात.याच आठवणींना उजाळा देण्यासाठी पुन्हा एकदा ‘जनस्थान’ ग्रुपतर्फे ‘आठवणीतला चहा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कॉलेज जीवन म्हटले की अनेकांना आठवते ती सलीम मामूची चहाची टपरी. अनेकजण या टपरीवर चहाचा आस्वाद घेत गप्पाबरोबर कडू गोड आठवणी शेअर करत होते. मग त्या प्रेमाच्या गोष्टी असो अथवा राजकीय, अनेकांनी या सलीमच्या चहाच्या आस्वादाने आपली स्वप्ने रंगवली आणि त्यात यशस्वी झाले, काहीजण अजूनही वाटचाल करीत आहेत.
याच आठवणींना उजाळा देण्यासाठी, शनिवार १ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन जनस्थान ग्रुप चे प्रमुख अभय ओझरकर,,११.३० @सलीम ग्रुप चे प्रमुख प्रसाद गर्भे तसेच विनोद राठोड,भूषण मठकरी,रवी जन्नवार यांनी केले आहे.
आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे हा….. आणि नविन वर्षाचा आला पहिलाच कार्यक्रम! चुकवणार नाहीच…
आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे हा….. आणि नविन वर्षाचा आपला पहिलाच कार्यक्रम! चुकवणार नाहीच…