जनस्थान महोत्सवाचा आज प्रारंभ :चित्र-शिल्प प्रदर्शनाचे होणार उद्घाटन
नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे आणि बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे, रघुवीर अधिकारी, योगेश परांजपे, नवीन शिवहरे यांची प्रमुख उपस्थिती...
नाशिक,दि ,१६ जून २०२४ –‘जनस्थान’हा व्हाट्सअप ग्रुप दरवर्षी आपला वर्धापनदिन अनोख्या पद्धतीने साजरा करतो. यंदाही हा सात दिवस चालणारा उत्सव नाशिकमध्ये साजरा होत असून यात दि. १६ ते १९ तारखेपर्यंत असे चार दिवस ‘ दृष्यभान’ या चित्र -शिल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कुसुमाग्रज स्मारकातील कलादालनात भरणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन रविवार दि १६ जून रोजी सकाळी ११ वाजता नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे आणि बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे, रघुवीर अधिकारी, योगेश परांजपे, नवीन शिवहरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
‘जनस्थान’मधील सर्व सन्माननीय चित्रकारांनी केलेली चित्रनिर्मिती या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. यावर्षीचे वेगळेपण म्हणजे जनस्थान परिवाराच्या बाहेरील कलावंतांनाही सन्माननीय आमंत्रित म्हणून बोलविण्यात आले आहे. नाशिककरांना त्याचाही आस्वाद घेता येईल. यावेळी शिल्पकार दोन दिवस प्रत्यक्ष शिल्प निर्मिती करून दाखवणार आहेत.
या प्रदर्शनात नंदन दीक्षित, अतुल भालेराव, स्नेहल एकबोटे, डॉ.शेफाली भुजबळ, राजेश सावंत, प्रफुल्ल सावंत, निलेश गायधनी, धनंजय गोवर्धने, सी. एल. कुलकर्णी, प्रणव सातभाई, शुभांगी पाठक, पूजा निलेश, राजू देसले, विनोद राठोड, अपर्णा क्षेमकल्याणी, यतीन पंडित, महारुद्र अष्टुरकर, राजा पाटेकर, श्रेयस गर्गे, सुहास जोशी, श्रीकांत नागरे, प्रफुल्ल चव्हाण, दीपक वर्मा, दीपक गरुड, मुंजा नरवाडे, अशोक धिवरे, सचिन पाटील, नूतन न्याहारकर, नितीन बिलदीकर, भारती हिंगणे, संजय दुर्गावाड, अनिल अभंगे, नंदकुमार देशपांडे, मनोज जोशी, वरुण भोईर, संतोष मासाळ, विजय थोरात हे नामवंत चित्रकार, शिल्पकार या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. दररोज सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत हे प्रदर्शन कुसुमाग्रज स्मारकात सर्वांसाठी खुले असणार आहे.
या अनोख्या प्रदर्शनाचा नाशिककरांनी आनंद घ्यावा असे आवाहन ग्रुपचे प्रमुख अभय ओझरकर, विनोद राठोड आणि स्वानंद बेदरकर यांनी केले आहे.
कार्यक्रमासाठी दीपक बिल्डर्स चे दीपक चंदे, एस डब्लू एस चे रघुवीर अधिकारी , गोपाळ पाटील,रेडिओ मिर्चि, राजेश पिंगळे,हॉटेल पंचवटी यात्रीचे भुतडा ,सचिन गीते यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.