जनस्थान प्रिमियर लीग : कलाकारांची अनोखी क्रिकेट स्पर्धा
अनोख्या क्रिकेट स्पर्धत नाशिकमधील दिग्गज कलावंतांचा सहभाग
नाशिक – कोरोना च्या दोन वर्षांच्या नाकोश्या मध्यांतरा नंतर कलाकारांनी एकत्र येत क्रिकेट च्या रूपाने आपला वेगळा आनंद साजरा केला. जनस्थान या नाशिक मधील कलाकारांच्या व्हॉट्सॲप ग्रुप च्या माध्यमातून नेहेमीच विविध उपक्रम राबवले जातात त्यात जुन्या कॉलेज च्या आठवणींना उजाळा देणारा, आठवणींचा चहा असेल की जनस्थान वर्धापन दिनानिमित्त सगळे कलाकार मिळून साजरा होणारा जनस्थान कला महोत्सव असेल पण गेली दोन वर्ष कोरोना च्या संकटात हे सगळंच बंद पडलं होत आणि या करोना काळात कलाकारांनाही अतिशय बिकट परिस्थितीतून जावे लागले या सगळ्याचा कुठेतरी विसर पाडवा आणि सगळ्या कलाकारांना एकत्र भेटण्याचा आनंद घेता यावा म्हणून २ वर्षांच्या विश्रांती नंतर जनस्थान प्रीमियर लीग ही कलाकारांची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याची आली होती,
या मध्ये प्रसिद्ध अभिनेता चिन्मय उदगीरकर, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मधील तात्या आजोबांची लोकप्रिय भूमिका करणारे सी एल कुलकर्णी , विश्वास बँकेचे – विश्वास ठाकूर चित्रपट महामंडळाचे शाम लोंढे, दिग्दर्शक सुहास भोसले, प्रसिद्ध गायक अविराज तायडे, मकरंद हिंगणे, ज्येष्ठ संवादिनी वादक सुभाष दसककर, ज्येष्ठ तबला वादक – नितीन पवार आणि नितीन वारे, बासरी वादक – मोहन उपासनी,ज्येष्ठ संगीतकार धनंजय धुमाळ, ज्ञानेश्वर कासार,शुभांगी पाठक, लेखक आणि दिग्दर्शक संतोष प्रभुणे, अभिनेत्री नुपूर सावजी इ. गायक, वादक, नाट्यकर्मी , रंगकर्मी, अश्या दिग्गज कलाकारांनी सहभाग नोंदविला.
सात कलाकारांची एक टीम या प्रमाणे सात टीम तयार करण्यात आल्या होत्या त्यात प्रत्येक टीम मध्ये एक महिला कलाकार सहभागी होती या संघांचे प्रायोजकत्व कलाकारांमधीलच – शाम लोंढे, अनिल दैठणकर, प्रज्ञा भोसले – तोरसकर, नितीन पवार, अविराज तायडे, नितीन वारे , आणि आशिष रानडे स्वीकारले.
स्पर्धेसाठी विश्वास ठाकूर यांनी विश्वास लॉन ने बॉक्स क्रिकेट चे ग्राउंड कलाकारांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिले. स्पर्धेची सुरुवात धडाकेबाज झाली पहिल्याच सामन्यात पाच ओव्हर मध्ये धुवाधार फटकेबाजी करत प्रसिद्ध अभिनेता चिन्मय उदगीरकर याने ५३ धावा तर प्रसिद्ध रेडिओ जॉकी RJ भूषण यांनी ६४ धावा ठोकून संघासाठी १२४ धावाचा डोंगर उभा केला आणि विजय संपादित केला. दोन दिवसात प्रत्येक संघास ३ सामने खेळण्याची संधी देण्यात आली.
सामान्यांच्या दरम्यान ज्येष्ठ – संवादिनी वादक – सुभाष दसककर प्रकाश योजनाकार विनोद राठोड प. अविराज तायडे, विनोदी आणि खुमासदार शैलीत सामन्याचे समालोचन केले, अंतिम सामना – अनिल दैठणकर यांचा संघ विरुद्ध नितीन पवार यांच्या संघा असा झाला या मध्ये नितीन पवार यांच्या संघाने १ षटक राखून बाजी मारली. सामने संपल्या नंतर लगेचच बक्षीस वितरण सोहळा पार पडला ज्यामध्ये नितीन पवार यांच्या संघाला विजेता म्हणून तर अनिल दैठणकर यांच्या संघाला उपविजेता म्हणून सन्मानित करण्यात आले.
४ सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करून षटकार आणि चौकरांचा पाऊस पडणाऱ्या आणि ३ हाफ सेंच्युरी करणाऱ्या RJ भूषण ला मॅन ऑफ द सिरीज . तर सचिन शिंदे यास त्याच्या उत्कृष्ट बॅटिंग साठी बेस्ट बॅट्समन तर RJ ऋचा देशपांडे शाह हिला उत्कृष्ट बॉलिंग साठी बेस्ट बॉलर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, डी जे बिल्डर्स चे डी जे हंसवणी, विपुल मेहता ,साळुंके,कैलास पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते, ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रवी जन्नावार ,भूषण मटकरी, विनायक रानडे ,विनोद राठोड ,राजा पाटेकर ,ईश्वरी दसककर,पराग जोशी,यांच्या सह जनस्थानच्या सदस्यांनी विशेष प्रयत्न केले या स्पर्धसाठी डेअरी पॉवर चे विशेष सहकार्य लाभले अशी माहिती जनस्थान ग्रुपचे कुटुंब प्रमुख अभय ओझेरकर यांनी दिली.