आज रंगणार जनस्थानचा आयकॉन पुरस्कार सोहळा
ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांची प्रमुख उपस्थितीत मान्यवरांचा सन्मान
नाशिक – नाशिकच्या सांस्कृतिक आणि कला जीवनात आपल्या सर्जनशील, वेगळ्या आणि मोठ्या कामाने योगदान देणाऱ्या तीन मान्यवरांचा सन्मान दरवर्षी ‘जनस्थान’ या व्हॉट्स ॲप ग्रुपच्यावतीने केला जातो. तोच आयकॉन पुरस्कार सोहळा आज सायंकाळी सहा वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृहात रंगणार आहे.अशी माहिती जनस्थानचे प्रमुख अभय ओझरकर यांनी दिली आहे.
‘जनस्थान’ या व्हाट्सअप ग्रुपचा आठवा वर्धापन दिन दिनांक २० जून ते २५ यादरम्यान नाशिकमध्ये साजरा होत असून त्या दरम्यान दिले जाणारे आयकॉन पुरस्कार अभिनेते व लेखक दीपक करंजीकर, ग्रंथमित्र विनायक रानडे आणि कवी-गीतकार प्रकाश होळकर यांना जाहीर झाले आहेत.आज कवी अशोक बागवे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
याबरोबरच २४ जून रोजी ‘पंचतत्व’ हा विषय घेऊन स्वतंत्रपणे विषय घेऊन गाण्याचा कार्यक्रम होणार आहे जनस्थानचे कवी गीतकार कवितालेखन करून त्याला ग्रुपमधील संगीततज्ज्ञ संगीत साज चढवीत आहेत.तसेच २५ जून रोजी नृत्यरंग कार्यक्रमातून जनस्थान मधील दिगग्ज कलावंत अनोख्या नृत्याच्या अनोखा अविष्कार सादर होणार असून या कार्यक्रमाने जनस्थान फेस्टिव्हलची सांगता होईल. या अनोख्या महोत्सवाचा नाशिककरांनी आनंद घ्यावा असे आवाहन स्वानंद बेदरकर ,विनोद राठोड यांनी केले आहे.