झारखंड रोपवे घटना: हेलिकॉप्टरमधून एक तरूण पडला :२५०० फूट उंचीवर काहीजण अडकले
३३ जणांना वाचवण्यात यश (व्हिडीओ पहा)
नवी दिल्ली – झारखंडमधील देवघर जिल्ह्यात त्रिकूट येथे रामनवमीच्या दिवशी पूजेसाठी अनेक लोकं तिथं गेली होती. त्यावेळी दोन रोपवेमध्ये टक्कर झाल्यानंतर १० एप्रिलपासून काही लोकअडकली आहेत.आज हा तिसरा दिवस आहे. ४० तास उलटून गेलनंतर हि काही लोक रोपवेमध्ये अडकली आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.घटनास्थळी दाखल झालेल्या एनडीआरएफच्या जवानांना बचावकार्य करताना अडचण येत असल्याने अद्याप सगळ्यांना बाहेर काढता आलेलं नाही.आज एका तरूणाची रोपवेमधून सुटका करीत असताना तो हेलिकॉप्टरमधून खाली पडला. तरूण खाली पडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
रामनवमीची पूजा आणि दर्शनासाठी शेकडो पर्यटक रविवारी देवघरात दाखल झाले होते. यादरम्यान रोपवेची एक ट्रॉली खाली येत असताना ती वर जाणाऱ्या ट्रॉलीला धडकली. हा अपघात झाला त्यावेळी सुमारे दोन डझन ट्रॉल्या वरती होत्या.झारखंडमधील देवघर येथील त्रिकूट पर्वतीय रोपवे अपघाताचा आज तिसरा दिवस आहे.२५०० फूट उंचीवर आता एकच ट्रॉली अडकल्याचे सांगण्यात येत आहे. या ट्रॉलीमध्ये अजूनही दोन लोक आहेत, जे ४० तासांहून अधिक काळ येथे अडकले आहेत. त्याच वेळी, हवाई दलाने तिसऱ्या दिवशी १२ जणांना बाहेर काढले आहे.
बचावकार्य पूर्ण होण्याची शक्यता
देवघर रोपवे दुर्घटनेतील बचाव मोहिमेच्या प्रभारी अश्विनी नायर यांनी सांगितले की, आम्ही सातत्याने बचाव कार्य करत आहोत. आता वरती मोजकेच लोक उरले आहेत. त्यांनी सांगितले की, दुपारपर्यंत सर्व लोकांना सुखरूप बाहेर काढले जाईल अशी अपेक्षा आहे.
३३ जणांना वाचवण्यात यश
लष्कर, हवाई दल, आयटीबीपी, एनडीआरएफ यांच्या संयुक्त कारवाईत सोमवारी सुमारे ३३ जणांना वाचवण्यात यश आले. या बचाव कार्यात लष्कराची दोन हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली आहेत. मात्र अंधार पडल्याने सोमवारी उशिरा ही कारवाई मागे घेण्यात आली. त्यामुळे लोकांना अन्न व पाण्याचे साहित्य मिळणेही कठीण झाल्याने वरती अडकलेले लोक रात्रभर भुकेने तहानलेले होते. डोंगरावर अडकलेल्या लोकांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.
तरूण हेलिकॉप्टरमधून पडल्यानंतर बचावकार्य थांबवलं होतंरामनवमीच्या दिवशी पूजेसाठी अनेक लोकं तिथं गेली होती. त्यावेळी हा अपघात झाला आहे. अपघात झाल्यांनतर तात्काळ तिथल्या स्थानिक लोकांच्या मदतीन बचावकार्य सुरु कऱण्यात आलं. परंतु एका तरूणाला रोपवेमधून बाहेर काढत असताना तो खाली पडला. जंगल आणि पुर्णपणे दगडाचा परिसर असल्याने अडकलेली लोक पुर्णपणे भयभीत झाली होती. सध्या फक्त आठ लोक अडकलेली आहेत. त्यांना तासाभरात बाहेर काढण्यात येईल असं एनडीआरएफच्या जवानांनी सांगितलं आहे.
#WATCH | IAF recommenced rescue operations at Deoghar ropeway in Jharkhand, early this morning.
(Video source: IAF Twitter handle) pic.twitter.com/XstP7ESWAE
— ANI (@ANI) April 12, 2022
Jharkhand | Rescue operation underway at Deoghar where a ropeway accident occurred on April 10 pic.twitter.com/yCXGyMRbwQ
— ANI (@ANI) April 12, 2022