नाशिक शहराला चित्रपटसृष्टीची परंपरा ‘दादासाहेब फाळके’ यांच्यामुळे लाभली आहे. परंतु मराठी सिनेमा म्हटलं की त्याला खूपच कमी प्रेक्षकवर्ग लाभत असल्याचे अनेकवेळा निदर्शनास आल्याने नाशिकच्या ‘विष्णू किरण फिल्म्स’ या निर्मात्यांनी ‘ऑरेंज लिली’ हा चित्रपट हिंदी भाषेत निर्माण करून ओटीटीवर ‘जिओ सिनेमा’ च्या माध्यमाने नुकताच प्रसारित केला. इतर भाषिकांप्रमाणे यातही आपल्या मातृभाषेचा म्हणजेच मराठी भाषेचा सन्मानपूर्वक वापर केला आहे, हे विशेष!
नाशिकच्या विष्णु किरण फिल्म्स प्रोडक्टशनचा हा पहिला हिंदी सिनेमा आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि चित्रपट निर्मितीचा ध्यास या बळांवर नाशिकचे किरण के राव आणि वेंकटेशा पवार यांनी या चित्रपटासाठी कठोर परिश्रम घेतल्याचे चित्रपट बघतांना जाणवते. सकस कथानक, उत्तम दिग्दर्शन, अचूक चित्रीकरण आणि अभिनय या महत्वाच्या बाजू सक्षमपणे सांभाळल्या आहेत.
रंगभूमी आणि मालिका यामधून आपली अभिनय क्षमता सिद्ध केलेले कलावंत या चित्रपटात असल्याने चाहत्यांनी हा चित्रपट आवर्जून बघितला आहे. हि कलाकार मंडळी आजही नाटक आणि मालिकांमध्ये कार्यरत आहेत. त्यांचा एक चाहता वर्ग आहे. समीर वंजारी यांच्या उत्कंठावर्धक कथानकाचा सकारात्मक परिणाम, प्रेक्षकांना शेवटपर्यंत सस्पेन्समध्ये ठेवणारा धागा आणि एकुणात मांडणी उत्तम असल्याने प्रेक्षकांची पसंती या चित्रपटाला लाभते आहे. मूळ कथानकाला सादर करण्यात कोणतीही कसूर होऊ नये यासाठी दिग्दर्शनाची जबाबदारी समीर वंजारी यानेच पेलली आहे.
दिग्दर्शकबरहुकुम अभिनेत्री मीरा जोशी आणि देवेंद्र गायकवाड या दिग्गज कलावंतांनी आपापली भूमिका चोख निभावली आहे. कथानकातील तणाव सैल करण्यासाठी इन्स्पेक्टर देव हे पात्र, त्याचे संवाद आणि अभिनय खूपच उपयोगी ठरतात. नितीन धंदुके आणि कुशल शिंदे यांच्या अभिनयातून त्यांचा रंगभूमीशी असलेला संबंध प्रतीत होतो.
कथानकातील सस्पेन्स खेळवत ठेवण्यात ही दोन्ही पात्रे महत्वाची भूमिका बजावतात. मावशीच्या भुमिकेत अभिनेत्री आणि निर्माती किरण के.राव आणि बंड्याच्या अगदी लहान भूमिकेत भाऊ वेंकटेशा पवार यांनी मजा आणली आहे.कथानकाचं रहस्य अबाधित ठेवायचं असल्याने रसिकांनी हा चित्रपट जिओ सिनेमाच्या ओटीटी वर आवर्जून बघावा, एवढंच!
Orange lily
Suspense thriller movie
Duration :- 1 hour 27 minutes
निर्माता :- किरण के राव
वेंकटेशा पवार
लेखक :- समीर वंजारी, शुभम सुद्रिक
दिग्दर्शक :- समीर वंजारी
डिओपी :- सोपान पुरंदरे
कलाकार :- मीरा जोशी
देवेंद्र गायकवाड
अभिनीत पंगे
नितीन धंदुके
हेमंत फरांदे
कुशल शिंदे
किरण के राव
वेंकटेशा पवार
श्वेतांबरी